पुणे, १ फेब्रुवारी २०२३ : संयुक्त अरब अमिराती येथील अबुधाबी, दुबई व शारजामधील स्थायिक झालेल्या सर्व खानदेशी बांधवांनी दरवर्षीप्रमाणे गुरुवारी (ता. २६) अबुधाबी येथे एकत्र येऊन भारताचा ७४ वा प्रजासत्ताकदिन व खानदेश मेळावा आगदी उत्साहात साजरा करण्यात आला.
संयुक्त अरब अमिराती येथील अबुधाबी, दुबई व शारजामध्ये राहत असलेले धुळे, नंदुरबार, जळगाव व नाशिक या जिल्ह्यांतील नागरिकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात दिसली. कार्यक्रमात बालगोपाळांनी स्वातंत्र्यवीरांच्या वेशभूषा परिधान करून महापुरुषांचा आठवणींना उजाळा दिला.
या कार्यक्रमाला संपूर्ण संयुक्त अरब अमिरातीमधील अडीचशेहून अधिक खानदेशी
बांधव एकत्र आले होते. मुला-मुलींसाठी विविध प्रकारचे खेळ घेण्यात आले. त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. लहानग्यांसोबत मोठ्यांनीही मैदानी खेळांचा आनंद लुटला.
‘फॅशन-शो’साठी मोहिनी अमृतकर, पल्लवी अमृतकर,
स्वाती भोळे व विविध खेळांसाठी कमलेश जगताप, सायली
पाटील, दीपाली चौधरी यांनी परिश्रम घेतले. खेळांसाठी स्पर्धकांची नावनोंदणी योगेश गाजरे, योगेश अमृतकर, सुचिता भामरे, आशिष भोळे यांनी केली. त्याचबरोबर छायाचित्रण अनिल वायकर, संजय पाटील, चेतन जावळे, अमोल भामरे यांनी केले. साउंड सिस्टीम व डीजेची जबाबदारी मनोज बागल यांनी सांभाळली. सर्वांनी आपापली जबाबदारी चोख पार पडली.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भूषण चौधरी, महेश जायखेडकर,
घनश्याम पाटील, राहुल पाटील, गणेश बोरसे, चांद्रशेखर जाधव, योगेश पगार यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी विविध अहिराणी गाण्यांवर ठेका धरला.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील