गोल पोस्ट राष्ट्रीय भारताची चांद्रयान-३ मोहिम उद्यापासून,पाठोपाठ आता चीनने चांद्र मोहिमेची केली घोषणा

भारताची चांद्रयान-३ मोहिम उद्यापासून,पाठोपाठ आता चीनने चांद्र मोहिमेची केली घोषणा

नवी दिल्ली, १३ जुलै २०२३ : भारताची चांद्रयान-३ मोहिम उद्यापासून सुरू होत आहे. भारतीय अवकाश संसोधन संस्था इस्रो चांद्रयान-३ च्या लॉन्चिंगसाठी सज्ज आहे. संपूर्ण देशवासीयांचे डोळे या महत्वकांक्षी मोहिमेकडे लागले आहेत. चंद्रावर लँडरच यशस्वी लँडिंग आणि रोव्हरच्या माध्यमातून संशोधन ही इस्रो समोरची दोन मुख्य लक्ष्य आहेत.भारतीय चांद्रयान-३ मिशन लॉन्चिंगच्या प्रतिक्षेत असताना शेजारच्या चीनने मोठी घोषणा केली आहे.इतर क्षेत्रांप्रमाणे भारत आणि चीनमध्ये अवकाश संशोधन क्षेत्रातही स्पर्धा आहे. भारताची चांद्रयान-३ मिशन लॉन्चिंगची वेळ जवळ आलेली असताना, आता चीनने त्यांच्या चांद्र मोहिमेची घोषणा केली आहे.

चीनने त्यांच्या मानवी चंद्र मोहिमेची घोषणा केली आहे. २०३० मध्ये मानवाला चंद्रावर पाठवण्याची चीनची योजना आहे. चीन या मिशन अंतर्गत दोन रॉकेट्स चंद्राच्या कक्षेत पाठवणार आहे. सध्या जगामध्ये अमेरिका एकमेव देश आहे, ज्यांनी अपोलो मिशन अंतर्गत १९६८ ते १९७२ दरम्यान मानवी चंद्र मोहिमा केल्या आहेत. अमेरिका सोडल्यास कोणत्याही देशाने चंद्रावर माणूस पाठवलेला नाही.

मानवी अवकाश मोहिम प्रत्यक्षात आण्यासाठी चीनला अजून शक्तीशाली रॉकेट विकसित करण्यात तंत्रज्ञान अवगत झालेले नाही. चीनच्या मानवी मोहिमेत, वैज्ञानिक उद्दिष्टय पूर्ण केल्यानंतर लँडर पुन्हा अवकाशवीरांना घेऊन चंद्रावर येईल. चंद्रावर माणूस पाठवण्याच्या मोहिमांना पुन्हा एकदा गती आली आहे. चंद्रावरील खनिजांचा शोध घेणे, हे अमेरिका आणि चीनच मुख्य लक्ष्य आहे. चंद्रावर मानवी वस्ती स्थापित करणे शक्य आहे का? हा सुद्धा उद्देश आहे. सध्या मंगळ ग्रहावर त्याच दृष्टीने संशोधन सुरु आहे. भारताची चांद्रयान-२ मोहिम अखेरच्या टप्प्यात अपयशी ठरली होती. मिशन पूर्ण व्हायला शेवटची काही मिनिट शिल्लक असताना इस्रोचा लँडरशी संर्पक तुटला होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

error: Content is protected !!
Exit mobile version