दक्षिण आफ्रिका विरुद्ध आजच्या सामन्यात भारताची ‘करो या मरो’ स्थिती

पुणे, ९ ऑक्टोबर २०२२ : दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात आज दुसरा एक दिवसीय सामना होणार आहे. भारताला या मालिकेत आपले आव्हान कायम राखायचे असेल, तर आजचा सामना जिंकणे अत्यंत आवश्यक आहे. पहिल्या सामन्यात शिखर धवनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला ९ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.

पहिल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी निराशजनक कामगिरी केली होती, त्यामुळे या महत्त्वाच्या सामनासाठी भारतीय संघात मोठे बदल होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्याचबरोबर दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडलेल्या दीपक चहर च्या जागी बीसीसीआयने वॉशिंग्टन सुंदर चा संघात समावेश केला आहे.

दरम्यान दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि आवेश खान यांना साजेशी अशी कामगिरी करण्यात आतापर्यंत अपयशी ठरलेत, त्याच बरोबर रवी बिस्नोही पहिल्या सामन्यात चांगलाच महागात पडला होता. त्यामुळे त्याच्या जागी फिरकी गोलंदाज शाहबाज अहमद ला संधी मिळू शकते.

दरम्यान आज मालिकेतील दुसरा सामना दुपारी १:३० वाजता रांची येथे खेळवला जाणार आहे. आज भारतीय संघ पराभूत झाल्यास दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर सलग दुसरी मालिका गमावेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा