भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू INS विक्रांत पंतप्रधान मोदींनी केली देशाच्या स्वाधीन

कोची (केरळ): २ सप्टेंबर २०२२, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत राष्ट्राला समर्पित केली. विक्रांत २५ वर्षा नंतर नव्या रूपात नौदलाची शान बनली आहे. या वेळी पीएम मोदी म्हणाले की,’विक्रांत मोठी आहे, विराट आहे, ती विशिष्ट आहे, विक्रांत खास आहे. विक्रांत ही केवळ युद्ध नौका नाही. २व्या शतकाती भारताच्या कठोर परिश्रम, प्रतिभा, प्रभाव आणि वचनबद्धतेचा हा पुरावा आहे. विक्रांत ही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावाचे अतुलनीय अमृत आहे. विक्रांत हे भारताच्या स्वावलंबित होण्याचे अनोखे प्रतीबिंब आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले,’ त्यावेळी ब्रिटिश संसदेत कायदा करून भारतीय जहाजे आणि व्यापाऱ्यांवर किती कठोर निबंध लागले गेले, याचा इतिहास साक्षीदार आहे. या सागरी शक्तीच्या बळावर छत्रपती विर शिवाजी महाराजांनी अशी नौदल उभारली, ज्यांनी शत्रूंची झोप उडविली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: सुरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा