चालू आर्थिक वर्षात भारताचा GDP 9.2 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज

नवी दिल्ली, एएनआय, 10 जानेवारी 2022: 2020-21 मध्ये 7.3% च्या संकुचिततेच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात भारताचा GDP 9.2 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस (NSO) ने शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ही वाढ प्रामुख्याने कृषी आणि उत्पादन क्षेत्राच्या कामगिरीतील सुधारणांमुळं दिसून येते. 2021-22 साठी राष्ट्रीय उत्पन्नाचा पहिला आगाऊ अंदाज, NSO ने म्हटले आहे की, 2020-21 मध्ये 7.3 टक्क्यांच्या संकुचिततेच्या तुलनेत 2021-22 मध्ये वास्तविक GDP मध्ये 9.2 टक्क्यांनी वाढ होईल.

कोरोनाव्हायरस साथीच्या रोगाच्या तिसऱ्या लाटेचा चौथ्या तिमाहीत 0.4 टक्क्यांच्या जीडीपी विकास दरावर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे आणि ती 4.5 ते 5.0 टक्क्यांपर्यंत असण्याची शक्यता आहे. क्रेडिट रेटिंग एजन्सी इक्रा रेटिंगने बुधवारी हा अंदाज व्यक्त केला. कोरोना विषाणूचं नवीन रूप ओमिक्रॉन समोर आल्यानंतर संसर्गाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत.

अलीकडेच, रेटिंग एजन्सी इक्राने सांगितलं होतं की ओमिक्रॉनमुळं विविध राज्यांमध्ये निर्बंध लादण्यात आल्याने चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत (जानेवारी-मार्च, 2022) आर्थिक रिकवरी वर परिणाम होऊ शकतो. तथापि, ओमिक्रॉन संकट असूनही ICRA ने भारताच्या GDP वाढीचा दर बदलला नाही. ICRA ने हा विकास दर पूर्वीप्रमाणेच नऊ टक्के इतकाच ठेवला आहे. इक्राचा हा अंदाज इतर संशोधन संस्थांच्या तुलनेत आधीच कमी आहे.

आरबीआयने चालू आर्थिक वर्षात जीडीपी 9.5 टक्के दराने वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. कोरोना महामारीमुळं भारतीय अर्थव्यवस्थेला 2021-22 या आर्थिक वर्षात 39.3 लाख कोटी रुपयांचं नुकसान होऊ शकतं असा अंदाज इक्राचा आहे. Icra च्या मते, पुढील वर्षी मार्चपर्यंत, भारतातील 85-90 टक्के प्रौढांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील. बूस्टर डोससह 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठीही लस जाहीर करण्यात आली आहे. मात्र, ओमिक्रॉन या कोरोनाच्या नवीन प्रकारावर ही लस कितपत प्रभावी ठरेल आणि तिसरी लाट दूर ठेवण्यात ती कितपत यशस्वी ठरते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा