T20 वर्ल्डकप मध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना आज संध्याकाळी खेळला जाणार आहे.ज्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.कारण भारताला आजूनही विजयाचा सूर गवसला नाही.पहिल्या सामन्यात भारताला पाकिस्तान कडून पराभव स्वीकारावा लागला होता.ज्यामुळे आता आजचा सामन्यात भारत संघ कसा वापसी करतो हे पहावे लागेल.
बदला घेण्याची संधी…..
२०१९ च्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंड ने भारताचा पराभव केला होता ज्यामुळे भारताचे वर्ल्डकप मिळवण्याचे स्वप्न भंगले.पण आजचा सामना हा T20 वर्ल्डकप चा असल्याने भारत संघ न्यूझीलंड ला हारवून आपला बदला पुर्ण करु शकतो.
कुणाला हि वगळण्याची इच्छा नाही……
भारताचा पहिल्या सामना पाकिस्तान कडून पराभव झाल्यानंतर न्यूझीलंड संघासाठी भारतीय संघात मोठे बदल होतील अशी चर्चा रंगली होती.मात्र मला कुणाला ही वगळण्याची इच्छा नाही असे कॅप्टन विराट कोहली यांनी स्पष्ट केले.त्यामुळे भारतीय संघात आजच्या सामन्यात बदल होणार नाही हे जवळ पास निश्चित झाले आहे.
शमीला २०० टक्के पाठिंबा…..
T20 वर्ल्डकप मध्ये भारताचा पाकिस्तान कडून पराभव झाल्यानंतर भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीवर अनेक स्तरावर टीका केली जात होती.तर त्याचा धर्मावरुन त्याला ट्रोल केले जाऊ लागले.ज्या मुळे विराट कोहली याने या प्रकरणाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला,आणि कोणाच्या ही धर्मावरुन टीका करणे अतिशय वाईट आहे.असे तो म्हणाला.तसेच शमीला माझा २०० टक्के पाठिंबा असल्याचे ही त्यांने सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी