त्रिनिदाद, वेस्ट-इंडिज २१ जुलै २०२३ : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसऱ्या आणि अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने ४ गड्यांच्या मोबदल्यात २८८* धावा केल्या होत्या.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील ऐतिहासिक १०० व्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात विराट कोहली आणि रवींद्र जडेजा सध्या क्रीजवर आहेत. विराट कोहलीने आपल्या ८७* धावांच्या खेळीत दोन मोठे विक्रम केले.
दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी, उत्कृष्ट समन्वय दाखवत पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत शतकी भागीदारी केली. टीम इंडियाच्या ४ विकेट पडल्यानंतर विराट आणि जडेजाने मिळून महत्त्वाची भागीदारी रचली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा विराट कोहली ८७* आणि रवींद्र जडेजा ३६* धावांवर खेळत होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड