गोल पोस्ट क्रीडा क्रिकेट भारताची टी-२० श्रृंखलेत धमाकेदार विजयानं सुरवात….

भारताची टी-२० श्रृंखलेत धमाकेदार विजयानं सुरवात….

ऑस्ट्रेलिया, ५ डिसेंबर २०२०: भारत ऑस्ट्रेलिया मधे T२० ची श्रृंखला सुरू झाली असून भारतानं विजयी सुरवात केलीय. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गेलेल्या भारताची वनडेची श्रृंखला काही खास राहीली नाही. भारताचा त्या मधे २-१ ने पराभव झाला होता.

भारतानं ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या पहील्या टी-२० सामन्यात ११ धावांनी विजय मिळवलाय. तर पहिल्यांदा बॅटींग करताना भारतानं ऑस्ट्रेलिया समोर १६२ धावांचं आव्हान ठेवलं. ज्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियांनं केवळ १५० धावा केल्या.

१६२ धावांचा स्कोर उभा करण्यासाठी के एल राहुल’नं सर्वाधिक ५१ धावा केल्या तर शेवटच्या षटकांमधे मोलाचा वाटा ऑलराऊंडर रवींद्र जडेजाचा आहे. त्याच्या नाबाद ४४ धावांमुळं भारताला १६१ धावापर्यंत मजल मारता आली.

या स्कोरचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरवात दमदार झाली. पण, मधे भारतीय गोलंदाजांनी त्यांना अडकवून ठेवलं. जडेजाच्या दुखापतीमुळं संधी मिळालेल्या फिरकीपटू युवजेंद्र चहल’नं धामेकदार गोलंदाजी करत ३ बळी टिपले तर त्याला उत्तम अशी साथ टी नटराजन देत त्यानंही ३ बळी घेतले. तर ऑस्ट्रेलिया कडून एरोन फिंच’नं सर्वाधिक ३५ धावा केल्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

error: Content is protected !!
Exit mobile version