भारताचा UPI आणि सिंगापूरचा Paynow होणार कनेक्ट, या लोकांना होणार फायदा

नवी दिल्ली, २१ फेब्रुवारी २०२३: भारताचा UPI आणि सिंगापूरचा Paynow यांना जोडण्याची तयारी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान ली सिएन लूंग एक महत्त्वाचा करार करणार आहेत. या करारानंतर सिंगापूरमध्ये राहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. सिंगापूरमध्ये राहणारे विद्यार्थी फक्त UPI द्वारे पेमेंट करू शकतील. दुसरीकडं, जर पालकांना भारतातून सिंगापूरला पैसे पाठवायचे असतील, तर ती प्रक्रियाही सुलभ होईल. हे सर्व रिअल-टाइम पेमेंट सिस्टम लिंकेजद्वारे होईल जे आज सुरू होणार आहे.

या रिअल-टाइम पेमेंट सिस्टम लिंकेजद्वारेच क्रॉस-बॉर्डर कनेक्टिव्हिटी सुलभ होईल. या करारामुळे, स्थलांतरित कामगारांचं जीवन सुसह्य होणार आहे कारण ते अत्यंत कमी दरात रेमिटन्सचे पैसे भारतात पाठवू शकतील. आता हे आवश्यक होतं कारण पूर्वी अनिवासी भारतीय UPI द्वारे पेमेंट करू शकत नव्हते. त्यासाठी त्याला भारतीय सिमची गरज होती. पण आता जेव्हा UPI आणि Paynow जोडले जातील तेव्हा ही समस्या दूर होईल आणि UPI द्वारे सिंगापूरमध्ये बसून पेमेंटही सहज होईल.

आज दोन्ही देशांचे पंतप्रधान सकाळी ११ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हा महत्त्वाचा करार करणार असल्याचं सांगण्यात येतंय. भारतातील RBI गव्हर्नर शक्तिकांता दास आणि सिंगापूरहून सिंगापूरच्या नाणे प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक रवी मेनन रिअल-टाइम पेमेंट सिस्टम लिंकेज लाँच करतील. येथे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) सध्या UPI चा इतर अनेक देशांमध्ये विस्तार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. हा सिंगापूर-भारत करार त्या दिशेने एक मोठं पाऊल मानलं जातंय.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा