मुंबई, ११ ऑगस्ट, २०२२: शिंदे गट आणि ठाकरे सेना यांच्या फूटीनंतर आता उरलेल्या गटात नाराजी असल्याचं दिसून आलं. यातही खास करुन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आता फूट पडायला लागली आहे, असं दिसतंय. यावर आता नाना पटोले यांनी या वादाला वाचा फोडली आहे. त्यांनी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांवरुन वादाला तोंड फोडलं. त्यांनी सांगितलं की, जर आम्हाला म्हणजे अर्थात काँग्रेसला महत्त्वाच्या निर्णयात का विचारात घेतलं जात नाही? तसेच महाविकास आघाडी ही नैसर्गिक आघाडी नाही. त्यामुळे ती कधीही तुटू शकते.
ही युती मुळात एका विपरीत परिस्थितीत झाली असून, त्यावेळी सोनिया गांधीनी ही युती केली. त्यावेळी आम्ही सत्तेत नव्हतो. आम्ही विरोधी पक्ष म्हणून काम करत होतो. त्यामुळे जर आमच्या निर्णयाला किंमत नसेल तर मात्र आम्हाला नक्कीच विचार करावा लागेल.
२०१९ मध्ये भाजपला लोकांनी निवडून दिले. तिथे १०५ आमदार निवडून आले होते. त्यामुळे तिथे आता लोकं पुढच्या वेळी भाजपला निवडून देतील का नाही, हा प्रश्न आता जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. पण जिथे महाविकास आघाडी आहे, तिथे काँग्रेसला कुणीच किंमत देत नाही. महत्त्वाच्या निर्णयामध्ये जर आम्हाला विचारात घेतलं जात नसेल, तर नक्कीच आम्हाला पुन्हा एकदा विचार करावा लागेल, असे फुटीचे संकेत नाना पटोले यांनी दिले आहेत. त्यामुळे मविआ आघाडी तुटते की रहाते, वाद होतात की संपतात, हे पहाणं गरजेचं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस