स्वदेशी तोफ ATAGS ने लाल किल्ल्यावरून दागला बॉम्ब, PM मोदींनी केले कौतुक, जाणून घ्या ताकद

5

नवी दिल्ली, १५ ऑगस्ट २०२२: १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला. पण यानंतर सुमारे ३० वर्षांनंतर प्रथमच जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राचा प्रकल्प सुरू करण्यात आला. तेव्हापासून आजपर्यंत भारत स्वदेशी शस्त्रे, क्षेपणास्त्रे आणि रणगाड्यांवर लक्ष केंद्रित करत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रथमच लाल किल्ल्यावरून स्वदेशी हॉवित्झर तोफांची सलामी देण्यात आली. Advanced Towed Artillery Gun System (ATAGS) असे या तोफेचे नाव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या भाषणात या तोफांचे कौतुक केले.

या तोफा DRDO च्या शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास आस्थापना (ARDE), Tata Advanced Systems Limited, Mahindra Defence Naval System आणि Bharat Forge Limited यांनी संयुक्तपणे बनवल्या आहेत. ही बंदूक १५५ मिमी/५२ कॅलिबरची आहे. अलीकडेच राजस्थानमधील पोकरन फील्ड फायरिंग रेंजवर याची यशस्वी चाचणी घेण्यात आली. ही तोफ नेऊन कुठेही तैनात करता येते. मग ती पाकिस्तानची सीमा असो किंवा चीनच्या सीमेजवळील लडाख असो.

४८ किमी अंतरापर्यंत करते मारा

भारतीय लष्कराकडे सध्या या १५५ मिमीच्या ७ तोफा आहेत. तिची पहिली चाचणी २०१६ मध्ये झाली होती. ४० तोफा मागवण्यात आल्या आहेत. याशिवाय आणखी १५० तोफांची निर्मिती करण्यात येणार आहे. ती चालवण्यासाठी ६ ते ८ लोकांची गरज आहे. बर्स्ट मोडमध्ये १५ सेकंदात ३ राउंड, इंटेंसमध्ये ३ मिनिटांत १५ राउंड आणि संस्टेंड मोड मधे ६० मिनिटांत ६० राउंड फायर होतात. त्याची फायरिंग रेंज ४८ किमी आहे. मात्र ती ५२ पर्यंत वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

चीन असो की पाक सीमा, सर्वत्र कहर

या तोफेचे वजन १८ टन आहे. तिच्या ट्यूब म्हणजेच बॅरलची लांबी ८००० मिलीमीटर आहे. ही उणे ३ अंश ते अधिक ७५ अंशापर्यंत उंची घेऊ शकते. जर HE-BB किंवा हाय एक्सप्लोसिव्ह बेस ब्लीड अॅम्युनिशन त्यात जोडले तर तिची रेंज ५२ किमी पर्यंत वाढते. यात थर्मल साइट आणि गनर्स डिस्प्ले आहे.

ATAGS विकसित करण्यासाठी सुमारे चार वर्षे लागली. तिची ऑर्डिनेंस सिस्टम आणि रिकोइल सिस्टममुळे थोडा विलंब झाला. २६ जानेवारी २०१७ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये ते पहिल्यांदा लोकांसमोर प्रदर्शित करण्यात आले. आतापर्यंत सहा ते सात चाचण्या झाल्या आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा