कॉम्प्युटरमधील अतिशय महत्त्वाचा भाग असलेल्या चिपचे डिझाइन भारतातच करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. सध्या चिप इंडस्ट्रीवर अमेरिकेतील इंटेल आणि जपानच्या आर्म या कंपनीचे वर्चस्व आहे. चीन आणि तैवानमध्येही मोठ्या प्रमाणावर चिप तयार होतात. भारतात इंटरनेटवरील रिस्क व्ही डिझाइनला मूळ आधार मानले आहे. पहिल्या चिपचे डिझाइनही बनले आहे. याची निर्मिती लवकरच सुरू होईल. भारतात सरकारी आणि व्यावसायिक स्तरावर हा प्रकल्प सुरू आहे.
इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी (आयटी)ही भारतातील महाकाय आणि सर्वात यशस्वी इंडस्ट्री आहे. बंगळुरू आणि हैदराबाद या दोन केंद्रांचा जीडीपीमधील वाटा १३% आहे. भारतातील काॅम्प्युटर सायन्स पदवीधरांना जगभरात मागणी आहे. अमेरिकेतील सध्या सर्वात मोठ्या टेक फर्म मायक्रोसॉफ्ट आणि गुगलचे मालक भारत वंशीय सत्या नडेला आणि सुंदर पिचाई हे आहेत. या दोघांचे शिक्षणही भारतात झाले आहे. भारतातील एक मोठा वर्ग कॉम्प्युटरवर काम करतो, पण खूप कमी लोक ते बनवण्याच्या व्यवसायात आहेत. जिओने भारताला जगातील सर्वात मोठा मोबाइल डेटाचा ग्राहक बनवले आहे. पण या नेटवर्कसाठी वापरली जाणारी उपकरणे आयात होतात. मागील वर्षी भारताने ३९०० अब्ज रुपयांचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आयात केले होते, तर निर्यात केवळ ५६८ अब्ज रुपयांची होती. भारतातील सर्वात प्रतिष्ठित इंडस्ट्री सध्याच्या स्पर्धेत फक्त आयातीवर अवलंबून आहे, तर काही देश फक्त निर्यात करत आहेत. त्यामुळे आता भारत चिप निर्मितीसाठी प्रयत्नरत आहे. अर्थात, ही शून्यातून सुरुवात आहे. देशात सेमीकंडक्टर बनवणारा एकमेव कारखाना चंदिगडमध्ये असून तो सरकारी आहे. खरं तर सेमीकंडक्टर सर्व इलेक्ट्रॉनिक गॅजेटचे हृदय समजले जाते. या कारखान्याची सुरुवात १९८३ मध्ये एका अमेरिकी चिप निर्माती कंपनीच्या भागीदारीतून झाली होती. पण आता ती कंपनी अस्तित्वात नाही. फॅब ही कंपनी अंतराळ विभागाच्या अधिपत्याखाली असून सैन्य दलासाठी उपयुक्त विशेष चिप ही कंपनी बनवते. चिप बनवणाऱ्या कारखान्यांना फॅब फॅब्रिकेशन प्लँट म्हटले जाते. आधुनिक कंप्युटिंग विकास सेंटर (सीडीएसी) या सरकारी संस्थेने काही चिपचे डिझाइन केले आहे. मात्र ते बनवण्यासाठी विदेशींची मदत घेतली होती.
२०१७ मध्ये भारत सरकारने नव्या चिप डिझाइन करण्यासाठी सीडीएसीमध्ये ३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. या चिप रिस्क-व्ही नामक ओपन सोर्स तंत्रज्ञानातून निर्मित होतील. परवान्याशिवाय ते चिप डिझाइनमध्ये सामील करता येताात. इंटेल किंवा आर्म कंपनीच्या चिपचे मालकी हक्क संबंधित कंपन्यांकडे आहेत. रिस्क-व्ही चिप्स सीडीएसीला स्वस्त पडतील. कारण त्यासाठी पाश्चिमात्य कंपन्यांना रॉयल्टी द्यावी लागणार नाही. विदेशातील सरकार या चिपनिर्मितीत अडथळा आणू शकत नाहीत. सीडीएसीने पहिल्या रिस्क-व्ही चिपचे डिझाइन पूर्ण केले आहे. त्याचे उत्पादन लवकरच सुरू होईल.
रिस्क व्ही या ओपन सोर्स डिझाइनची पोहोच बहुतांश लोकांपर्यंत आहे. दरम्यान, अमेरिकेने राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली सेमी कंडक्टरच्या निर्यातीवर निर्बंध लादले आहेत.