पाटणा, २२ जुलै २०२२: पाटणा विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या एका प्रवाशाने बॉम्ब असल्याचा दावा केला. माहिती मिळाल्यानंतर विमान उड्डाण थांबवण्यात आले. फ्लाइट ग्राउंड केल्यानंतर त्याचा शोध घेण्यात आला. मात्र, प्रवाशांच्या दाव्यानुसार, फ्लाइटमधून बॉम्ब सापडला नाही. आता शोधकार्य पूर्ण झाल्यानंतर आज सकाळी विमान रवाना झाले.
पाटणाचे डीएम चंद्रशेखर सिंह यांनी या घटनेला दुजोरा दिला. त्यांनी सांगितले की, इंडिगो फ्लाइट क्रमांक 6E2126 टेक ऑफ करत असताना ऋषी चंद सिंग नावाच्या प्रवाशाने दावा केला की त्यांच्याकडे बॉम्ब आहे. त्यानंतर उड्डाण रद्द करून संपूर्ण विमानाचा शोध घेण्यात आला. पोलिसांनी ऋषीचंद सिंग याला ताब्यात घेतले आहे. चौकशी केली जात आहे.
बॉम्ब निकामी पथकाने फ्लाइटची बारकाईने तपासणी केली. फ्लाइटमधून काहीही सापडले नसले तरी खबरदारी म्हणून फ्लाइट रद्द करून सर्व प्रवाशांना फ्लाइटमधून बाहेर काढण्यात आले. विमानात बॉम्ब असल्याचा दावा करणारा प्रवासी ऋषीचंद सिंग हा मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचा विमानतळ पोलिसांनी दावा केला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे