गोल पोस्ट आंतरराष्ट्रीय थायलंडमध्ये डे केअरमध्ये अंदाधुंद गोळीबार, ३२ जणांचा मृत्यू

थायलंडमध्ये डे केअरमध्ये अंदाधुंद गोळीबार, ३२ जणांचा मृत्यू

थायलंड, ६ ऑक्टोबर २०२२: थायलंडमध्ये एका डे केअरमध्ये एका माजी पोलीस अधिकाऱ्याने अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये ३२ लोकांचा मृत्यू झालाय.

AFP या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, नोंग बुआ लंफु या शहरात हा हल्ला झाला. थायलंडच्या ईशान्य भागात हे शहर वसले असून, हल्ल्यात अनेक लहान मुले आणि माणसे मारली गेली आहे. मृतांमध्ये २३ लहान मुलांचा समावेश आहे.

प्राथमिक वृत्तानुसार हल्लेखोर हा निलंबित पोलीस आहे. निलंबन झाल्यानंतर पोलिसाने हे धक्कादायक कृत्य केले. हल्लेखोराला अखेरचं बघितलं तेव्हा तो एक पांढऱ्या रंगाची, चार दरवाजांची टोयोटा पिक अप चालवत होता. या पिक अपचे रजिस्ट्रेशन बँकॉक येथे झाले होते.

दरम्यान, यापुर्वी २०२० मध्ये एका सैनिकाने २९ लोकांची हत्या केली होती. तर या हल्ल्यात ५७ जण जखमी झाले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी – प्रज्ञा फाटक.

error: Content is protected !!
Exit mobile version