डेन्मार्कच्या शॉपिंग मॉलमध्ये अंदाधुंद गोळीबार, अनेकांचा मृत्यू, चेंगराचेंगरी

डेन्मार्क, 4 जुलै 2022: डेन्मार्कमधील कोपनहेगन येथील एका मॉलमध्ये गोळीबार झालाय. त्या गोळीबारात अनेकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून एकाला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. किती लोक जखमी झाले आहेत हे अद्याप स्पष्ट झाले नाही, परंतु कोपनहेगनचे महापौर हा हल्ला अत्यंत गंभीर मानत आहेत.

घटनास्थळावरून काही चित्रंही समोर आली आहेत ज्यात लोक घाबरून इकडून तिकडे धावताना दिसत आहेत. मॉलमध्ये गोळीबार सुरू होताच लोक बाहेर धावले. ज्याला जिथं जागा मिळेल तिथे जाऊन तो लपला. कुणी दुकानाचा आसरा घेतला, तर कुणी मोकळ्या रस्त्यांवर धावताना दिसला. गोळ्यांचा खूप मोठा आवाज येत असल्याचं स्थानिक लोकांचं म्हणणं आहे. त्यानुसार तीन ते चार गोळ्या झाडण्यात आल्या. गोळीबारानंतर घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. लोकांनी या परिसरात फिरू नये, असे आवाहन करण्यात आलंय. या हल्ल्यात अनेकांचा मृत्यू झाल्याचीही माहिती पोलिसांनी दिली आहे. परंतु तरीही कोणत्याही प्रकारचा डेटा जाहीर करणे टाळलं जात आहे.

त्याचवेळी, या संपूर्ण घटनेबाबत महापौर सोफी हेस्टोर्प अँडरसन म्हणतात की, किती लोक जखमी झाले आहेत किंवा किती जणांचा मृत्यू झाला आहे हे अद्याप कळू शकलेले नाही, परंतु हा हल्ला चिंताजनक आहे, ही अत्यंत गंभीर बाब आहे. मोठी गोष्ट म्हणजे या रविवारी रात्री 11:30 वाजता ब्रिटीश पॉप स्टार हॅरी स्टाइल्स मॉलजवळील रॉयल एरिना येथे एक मोठा कॉन्सर्ट करणार होता. हजारो लोक आले आणि सर्व तिकिटे विकली गेली. हॉल आधीच खचाखच भरलेला असल्याने पोलिसांनी आयोजकांना कार्यक्रम ठेवण्याची परवानगी दिली आहे.

जखमींना उपचारासाठी कोपनहेगन येथील रिग्शोस्पिटलेट या प्रमुख रुग्णालयात दाखल करण्यात येत असल्याची माहितीही समोर आली आहे. सध्या रुग्णालयात तीनहून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र थोड्याच वेळात हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे, त्यामुळे रुग्णालयातील परिचारिका आणि शल्यचिकित्सकांची संख्या वाढवण्यात आली आहे. (फोटो: रॉयटर्स)

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा