प्रत्येक सिगारेट्सवर व्यक्तिगत स्वास्थ्य चेतावणी दिली जाणार, कॅनडा सरकारचा निर्णय

नवी दिल्ली, २ ऑगस्ट २०२३ : सिगारेट्स पिणाऱ्यांना आरोग्याच्या अनेक व्याधींना सामोरे जावे लागत असते. त्यामुळे सिगारेट्सच्या पाकिटावर सरकार वैधानिक इशारा छापत असते. आता कॅनडा सरकारने त्यांच्या नागरिकांनी सिगारेट्सचे व्यसन सोडावे यासाठी, त्यांना प्रेरित व्हावे म्हणुन एक नवीन निर्णय घेतला आहे. कॅनडा सरकारने म्हटले आहे की विक्री होणाऱ्या प्रत्येक सिगारेट्सवर व्यक्तिगत स्वास्थ्य चेतावणी दिली जाणार आहे. असे करणार कॅनडा हा जगातील पहिला देश ठरणार आहे.

आता येथून पुढे कॅनडात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक सिगारेट्सवर स्वास्थ्य चेतावणी लिहीली जाईल. सिगारेट्सवर लिहीले जाईल की सिगारेट्सने नपुंसकता आणि कॅन्सर सारखा आजार होऊ शकतो. याच बरोबर प्रत्येक झुरक्या सोबत विष असेही सावधानतेच्या सूचनेत लिहीलेले असेल. कॅनडा सरकारला वाटते की यामुळे देशातील सिगारेट्स पिणाऱ्यांच्या प्रमाणात कमी होईल. कॅनडाने गेल्या मे महिन्यात स्वास्थ्य संबंधी नियमावली जारी करण्याचे जाहीर केले होते. त्याची जगभरात चर्चा झाली होती. तम्बाकू उत्पादनांची पॅकेजिंग आणि चेतावनी नियम सरकारने अशा युवकांसाठी तयार केले आहेत जे सिगारेट्स सोडू इच्छीत आहेत.

सिगारेटवर छापलेला वैधानिक इशारा सिगारेट पिणाऱ्या व्यक्तींना सहज दिसेल असा छापला जाणार आहे. लोक एक सिगारेट विकत घेऊन पितात. त्यामुळे असे लोकांना पाकिटावर छापलेल्या सूचना दिसत नाहीत. त्यामुळे प्रत्येक सिगारेट्सवर सूचना छापण्याची गरज निर्माण झाल्याचे कॅनडाचे माजी व्यसनमुक्ती मंत्री कॅरोलिन बेनेट यांनी सांगितले. प्रत्येक सिगारेट्सवर छापलेली सूचना पाहून लोकांचे लक्ष जाईल. यातुन २०३५ पर्यंत देशातील तम्बाकूजन्य पदार्थांची विक्री ५% कमी करण्याची योजना आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा