एका व्यक्तीमुळे उद्योग प्रकल्प बाहेरच्या राज्यात- आदित्य ठाकरे

मुंबई, २९ ऑक्टोंबर २०२२ : महाराष्ट्रात येणारा वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्याने राज्यातील वातावरण चांगले तापले होत. दरम्यान आत्ता टाटा एअरबसही प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तपलेल आहे आत्ता यावरून सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप चालू आहे. तर उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. शिंदे-फडणवीस सरकारचं एक इंजिन फेल झाल्याने राज्यातील गुंतवणूक बाहेर जात असल्याचं ठाकरे म्हणाले आहेत.

जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार होते, तेव्हा आमचा केंद्र सरकारशी चांगला संवाद सुरू होता. मात्र सध्याचे घटनाबाह्य सरकार आल्यापासून सरकारचे एक इंजिन फेल झालेले आहे. याच कारणामुळे हे प्रकल्प परराज्यात गेले आहेत. कदाचित तिकडच्या राज्यांतील निवडणुकांमुळे हे झाले असेल.

कोणत्याही उद्योजक तसेच गुंतवणूकदाराला या सरकारवर विश्वास राहिलेला नाही. हे थोड्या दिवसांचे सरकार आहे. या सरकारमध्ये काही आमदार नाराज असल्याचे माझ्या कानी आले आहे. दोन-तीन आमदारांमध्ये जगजाहीर भांडण सुरू आहे. महाराष्ट्र सध्या ज्या परिस्थितीतून जात आहे, ते चांगले नाहीये. एका व्यक्तीच्या गद्दारीमुळे महाराष्ट्र मागील चार महिन्यांपासून फटके खात चालला आहे. कायदा सुव्यवस्था, उद्योग, शेतीकडे लक्ष न देता घाणेरडे राजकारण केले जात आहे.

शेतकऱ्यांचे हाल होत असताना वेदांता फॉक्सकॉन हातातून गेल्यानंतर आता टाटा एअरबसच्या पाठीमागे लागा असे सांगितले होते, तो प्रकल्प तरी महाराष्ट्रात आणा असं सांगितलं होतं. पण उद्योग जगातील चौथा मोठा प्रकल्प महाराष्ट्रतून निघून गेला आहे. पहिला प्रकल्प म्हणजे वेदांता फॉक्सकॉन, यासाठी ऑगस्ट पर्यंत बैठका झाल्या सप्टेबंरमध्ये हा प्रकल्प गुजरातला गेला

दुसरा बल्क ड्रग पार्क चार अन्य चार राज्यांना देण्यात आले, पण महाराष्ट्रात आणता आला नाही, हा प्रकल्प रायगड जिल्ह्यात येणार होता. मेडिकल डिव्हाइस पार्क जो संभाजीनगर जिल्ह्यात येणार होता. जुलैपासून आरडा ओरडा करतोय तो टाटा एअरबस तर जाऊ देऊ नका, तो देखील हातातून गेला, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

दरम्यान टाटा एअरबसच्या या प्रकल्पावरून विरोधकांनी टीका केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या वर प्रतिक्रिया दिली आहे. आज राज्यात टाटा एअरबसवरून जो काहूर माजवण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्याला उत्तर उद्योगमंत्री देत आहेत, योग्य वेळेला मी सुद्धा याची उत्तरं देईल. भविष्यात या राज्यात मोठे उद्योग आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्रातील तरुणांना आम्हाला रोजगार द्यायचा आहे. पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महाराष्ट्रात उद्योग देण्याचे आश्वासन दिले आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा