उल्हासनरमधील कोव्हीड सेंटरमध्ये रुग्णांना दिले गेले निकृष्ट दर्जाचे खाद्य पदार्थ

उल्हासनगर, ७ सप्टेंबर २०२०: सध्या कोरोना रोगाने सर्वत्र थैमान घातले आहे. अशातच उल्हासनरमध्ये एक घटना घडली आहे जी ऐकून तुम्ही थक्क व्हाल. उल्हासनरमधील कोव्हिड सेंटरमध्ये रुग्णांना चक्क निकृष्ट दर्जाचे खाद्य पुरवलं गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

उल्हासनगर महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या कोव्हीड सेंटरसाठी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सी. एस. आर. फंडच्या माध्यामातून एका संस्थेकडून बिस्कीट, खिचडी ,दूध पावडर आणि इतर साहित्य आणण्यासाठी महापालिकेने वडाळा येथे एक ४०८ टेम्पो पाठवला होता. टेम्पो मधून आलेले खाद्य पदार्थ हे निकृष्ट दर्जाचे आणि मुदत संपलेले होते. या सर्व प्रकरणाची पोल खोल महाराष्ट्र नवनिर्माण सेने कडून करण्यात आली आहे. यात मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन कदम , शहर अध्यक्ष बंडू देशमुख, उपशहर अध्यक्ष सचिन बेंडके, मुकेश सेठपालानी, उपविभाग अध्यक्ष रवी पाल, शाखा अध्यक्ष सचिन विभुते यांनी केली.

असे निकृष्ट व मुदत संपलेले खाद्य पदार्थ मागवून जर रुग्णांच्या आरोग्याशी खेळणार असाल तर मनसे आपल्या पद्धतीने धडा शिकवेल याची प्रशासन व सत्ताधारी यांनी नोंद घ्यावी. असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा