सर्वसामान्यांना महागाईचा झटका: अमूलच्या दूध दरात प्रतिलिटर तीन रुपयांनी वाढ; आजपासूनच नवे दर लागू

नवी दिल्ली, ३ फेब्रुवारी २०२३ :अर्थसंकल्पानंतर लगेचच आम जनतेला महागाईचा मोठा धक्का बसला आहे. अमूलने दुधाच्या दरात लिटरमागे तीन रुपयांनी वाढ केली आहे. दुधाचे वाढलेले दर आजपासून म्हणजेच ३ फेब्रुवारीपासूनच लागू होणार आहेत.

नव्या घोषणेनंतर ग्राहकांना अमूल गोल्डसाठी ६६ रुपये प्रति लिटर, अमूल फ्रेशसाठी ५४ रुपये प्रति लीटर पैसे मोजावे लागणार आहेत. तर, अमूल गायीच्या दूधासाठी ५६ रुपये प्रति लिटर आणि अमूल ए म्हशीच्या दूधासाठी ७० रुपये प्रति लीटर मोजावे लागणार आहेत.

दरम्यान, अमूलने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये दुधाच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ केली होती. एकूणच कामकाजाचा खर्च आणि दुधाचे उत्पादन वाढल्याने ही दरवाढ करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.

  • ‘अच्छे दिन’ ?

काँग्रेसने ‘अच्छे दिन’ असा उल्लेख करत भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. या संदर्भात काँग्रेसने एक ट्वीट केले आहे. ट्वीटमध्ये म्हटले आहे की, गेल्या १ वर्षात अमूलने दुधाच्या दरात प्रतिलिटर ८ रुपयांनी वाढ केली आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा