नवी दिल्ली, १५ फेब्रुवरी २०२१: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी देशातील नागरिकांना महागाईचा धक्का बसला आहे. एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत ५० रुपयांनी वाढ झाली आहे, तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही २६ पैशांनी वाढ झाली आहे.
या वाढीनंतर अनुदानित १४.२ किलो घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत ७६९ रुपये करण्यात आली आहे. पूर्वी ७१९ रुपये होते. ही किंमत आजपासून लागू आहे. दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रतिलिटर ८९ रुपयांच्या जवळपास पोहोचली आहे.
दिल्लीत पेट्रोल ८९ च्या जवळ
दुसरीकडे, गेल्या एका आठवड्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये सतत वाढ होत आहे. सोमवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात २६ पैशांची वाढ झाली. दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर ८९ रुपयांच्या जवळपास पोहोचले आहे. इतकेच नाही तर देशातील बर्याच शहरांमध्ये पेट्रोल ९९ चा आकडा पार करत १०० वर पोहोचताना दिसत आहे.
कच्च्या तेलाचे दरही मजबूत होत आहेत. भारतातील पेट्रोलियमची किंमत भारतीय बास्केट मध्ये येणाऱ्या कच्च्या तेलावर अवलंबून असली तरी, त्या किंमतीचा परिणाम २० ते २५ दिवसांनंतर दिसून येतो.
प्रमुख शहरांमध्ये किंमती
या वाढीनंतर दिल्लीत पेट्रोल ८८.९९ रुपये तर डिझेल ७९.३५ रुपयांवर गेले आहे. त्याचप्रमाणे मुंबईत पेट्रोल ९५.४६ रुपये आणि डिझेल ८६.३४ रुपये, चेन्नईत पेट्रोल ९१.१९ रुपये आणि डिझेल ८४.४४ रुपये आणि कोलकातामध्ये पेट्रोल ९०.२५ रुपये आणि डिझेल ८२.९४ रुपयांनी वाढविण्यात आले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे