लातूरच्या गूळ मार्केटमध्ये गुळाची आवक वाढली; ऐन संक्रांतीच्या सणाला दरात घसरण, शेतकरी आडचणीत

पुणे, १३ जानेवारी २०२३ : लातूरच्या गूळ मार्केटमध्ये विक्रीस येणाऱ्या गुळाची गेल्या आठ दिवसांत आवक वाढली आहे. गुरुवारी (ता. १२) ४ हजार ४७७ क्विंटल गुळाची आवक होऊन प्रतिक्विंटल ३ हजार १५० रुपये दर मिळाला आहे. गुळाची आवक वाढती असली, तरी भाव घसरला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी निर्माण केलेल्या गुळाला ऐन संक्रांतीच्या सणाला भाव मिळला नसल्यामुळे शेतकरी आर्थिक आडचणीत आले आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात चांगला पाऊस होत असल्याने उसाच्या क्षेत्रातही वाढ झाली आहे. उसाचे क्षेत्र वाढले असले, तरी गुळाचे उत्पादन घेणारे शेतकरी हे ठराविकच आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी निर्माण केलेल्या गुळाला ऐन संक्रांतीच्या सणाला भाव मिळला नसल्यामुळे शेतकरी आर्थिक आडचणीत आले आहेत. गुळाचा वापर विविध वस्तूंमध्ये होत आहे. विशेषत: तिळगुळाच्या रेवड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुळाचा वापर होऊ लागला आहे. साखरेपेक्षा गुळापासून बनविलेल्या वस्तूंना मागणी वाढली आहे; तसेच खाण्यासाठी गुलाबी गुळाची नागरिक मोठ्या प्रमाणात मागणी करीत आहेत.

लातूरच्या गूळ मार्केटमध्ये कर्नाटक बॉर्डर, उस्मानाबाद, औसा, निलंगा याबरोबरच तालुक्यातील स्थानिक पातळीवरच्या गुळाची आवक होत आहे. गूळ मार्केटमध्ये गेल्यावर्षी जानेवारीमध्ये १५ हजार ३६७ क्विंटल गुळाची आवक होऊन ३ हजार ५० रुपये सरासरी प्रतिक्विंटल दर मिळाला. तर डिसेंबरमध्ये ८ हजार ४४ क्विंटल गुळाची आवक होऊन ३ हजार ५०० रुपये प्रतिक्वंटल सरासरी दर मिळाला. तर सध्या गूळ मार्केटमध्ये गुरुवारी (ता.१२)
४ हजार ४७७ क्विंटल गुळाची आवक होऊन प्रतिक्विंटल ३ हजार १५० रुपये दर मिळाला आहे; तसेच बुधवारी (ता. चार जानेवारी २०२३) ५ हजार ३२४ क्विंटल गुळाची आवक होऊन ३ हजार २१० प्रतिक्विंटल दर मिळाला. सध्या गुळाची आवक वाढत असून, दरात घसरण होताना दिसून येत आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा