इन्फ्लूएंझा व्हायरस : चीनमध्ये लॉकडाऊनसारखी परिस्थिती; १५ दशलक्ष लोक घरात कैद

पुणे, १३ मार्च २०२३ : चीनमध्ये इन्फ्लूएंझाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याने, शांजी प्रांताची राजधानी शियान येथे लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे येथे कडक लॉकडाऊनने आधीच चिनी लोकांना अडचणीत आणले असून आता पुन्हा एकदा येथे आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. १५ दशलक्ष लोकसंख्या असलेल्या शिआनमध्ये, जिनपिंगचे अधिकारी शाळा, व्यवसाय आणि सार्वजनिक इमारतींना कुलूप लावण्याची योजना आखत आहेत, ज्याला येथील लोक कडाडून विरोध करीत आहेत. आणि लोकांना भीती आहे की जिनपिंगचे अधिकारी पुन्हा एकदा त्यांच्यावर अत्याचार करू शकतात.

महिनाभरापूर्वीपर्यंत जिनपिंग यांच्या कठोर कोविड धोरणांनी येथील सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले होते. कोविड धोरणाच्या विरोधात चिनी लोक रस्त्यावर उतरले, चिनी लोकांनी सोशल मीडियावरही आपला निषेध नोंदवला.

जिनपिंग यांच्या शियानमधील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, भविष्यात फ्लूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करावा लागला तर त्याची अंमलबजावणी केली जाईल. जरी फ्लू इतका धोकादायक मानला जात नाही. डोकेदुखी, ताप, खोकला, सर्दी आणि अंगदुखी अशी सामान्यतः इन्फ्लूएंझाची लक्षणे वर्णन केली जातात. या विषाणूमुळे मृत्यूचे प्रमाण नगण्य आहे. शिया अधिकाऱ्यांच्या नियोजनाला येथील लोक विरोध करत आहेत.

इन्फ्लूएंझामुळे लॉकडाऊन लागू करावे लागले तरीही… प्रत्येक फ्लूच्या हंगामात लॉकडाऊन लागू होईल का? आम्ही मागे हटणार नाही. ट्विटरच्या चिनी आवृत्ती Weibo वर काही इतर सोशल मीडिया वापरकर्त्यांनी सांगितले की, लोकांना घाबरवण्यापेक्षा लसीकरण करणे चांगले आहे. आणखी एका युझरने लिहिले की, कोरोनाच्या आधीही फ्लूचे अनेक सिझन आले; पण त्यानंतर लॉकडाऊन लागू करण्यात आले नाही.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा