इन्फोसिस मधील बारा हजार कर्मचाऱ्यांचा रोजगार जाणार

पुणे: भारतातील आणि जागतिक मंदी या कारणामुळे आयटी कंपन्यांना मोठा फटका बसत असल्याचे दिसून आले आहे. भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावरही आर्थिक मंदीचा प्रभाव पडलेला दिसत आहे. चीन आणि अमेरिका यांच्यामध्ये सुरू असलेले व्यापार युद्ध सर्वांनाच महागात पडत आहे. या सर्वाचा परिणाम आता रोजगारावर होत असताना दिसत आहे.
आता इन्फोसिस सारख्या दिग्गज आयटी कंपनी मधून बारा हजार कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे. यामध्ये वरिष्ठ अधिकारी व मध्यम स्तरावरील अधिकारी यांचा समावेश आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेच्या आधारावर निवड केली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा