सॅनिटरी नॅपकिन वितरणासाठी होरायझन असोशिएशनचा पुढाकार

पुणे, दि.१५ मे २०२० :कोरोनाच्या संकट काळात ज्यांना कुठलीही मदत उपलब्ध नाही, अशा गरजू मुली आणि महिलांना सॅनिटरी नॅपकिन वितरित करण्यासाठी होरायझन असोसिएशनने पुढाकार घेतला आहे.
या उपक्रमाचा प्रमुख उद्देश परप्रांतीय कामगार महिला, नोकरीवरून काढून टाकण्यात आलेल्या घरकाम करणाऱ्या महिला, वेगवेगळ्या झोपडपट्टीत राहणाऱ्या, एक वेळचा जेवण मिळण्यासाठी संघर्ष करत असलेल्या अशा सर्व महिलांना मदत करणे हा आहे.

तसेच मासिक पाळीबद्दलचे शिक्षण बदल घडवून आणते. सॅनिटरी डिस्ट्रीब्यूशन ड्राइव्ह हा उपक्रम गरीब सामाजिक व आर्थिक पार्श्वभूमीतून येणाऱ्या मुलींना सॅनिटरी नॅपकिन वितरित करून त्यायोगे त्यांना आरोग्य शिक्षण देणे, मासिक पाळी मुलींचे शिक्षण व सर्वांगीण विकासात अडसर निर्माण करता कामा नये ह्याच उद्देशाने सुरू करण्यात आला आहे.

या लॉकडाऊनमध्ये परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चाललेली आहे आणि अशा स्थितीत सॅनिटरी नॅपकिनच्या अभावामुळे स्त्रियांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याचा धोका आपण पत्करू शकत नाही.

गरीब आर्थिक व सामाजिक पार्श्वभूमीतून येणाऱ्या मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून त्यांच्यावर असलेला अधिक आर्थिक भार कमी करण्याचा होरायझन असोसिएशन चा मानस आहे.

ह्या उपक्रमाचा उद्देश :

१. सॅनिटरी नॅपकिन च्या अभावामुळे मुलींना शाळा सोडल्यापासून परावृत्त करणे. त्या ऐवजी त्यांना प्रोत्साहन देणे.

२. किशोरवयीन मुलींना पौगंडावस्था, मासिक पाळी दरम्यान राखावयाची स्वच्छता, ह्या कालावधीत शारीरिक व मानसिक आरोग्य राखणे या बद्दल चे शिक्षण देणे.

३. सॅनिटरी नॅपकिन आणि अंडरवियरच्या वार्षिक पॅक वितरित करून मुलींच्या शिक्षणात येणारे अडसर दूर करणे.

४. मुलींच्या मासिक पाळी बद्दल चे गैरसमज, भ्रम व चुकीची माहिती लोकांच्या मनातून काढून टाकणे.

५. गरीब महिला ज्यांना पुरेसे जेवण मिळणे ही अवघड आहे त्यांचा भार कमी करणे.

६. सॅनिटरी नॅपकिन ही एक जीवनावश्यक वस्तू आहे आणि सर्व गरजू महिलांसाठी उबलब्ध असणे गरजेचे आहे.

शेरखान चाळ कोंडवा, जनता वसात,भवानी पेठ, काशेवडी, कात्रज, सय्यद नगर, पिंपरी या परिसरातील महिलांना होरायझन असोसिएशन ने सॅनिटरी नॅपकिन तसेच सॅनिटाइजर चे वाटप केले आहे. अशा महिलांचे जीवन काही प्रमाणात सुखकर करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. या उपक्रमात आम्हाला चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा दिप्ती जाधव यांनी व्यक्त केली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: प्रगती कराड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा