गोल पोस्ट इतर राजकारण इंदापूर तालुक्यातील उद्योगांसाठी राज्यमंत्री भरणेंचा पुढाकार

इंदापूर तालुक्यातील उद्योगांसाठी राज्यमंत्री भरणेंचा पुढाकार

इंदापूर, ३ नोव्हेंबर २०२०: इंदापूर तालुक्यामधील होतकरू तरुणांना रोजगाराची संधी निर्माण होण्यासाठी राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्हा पालकमंत्री दत्तात्रय भरणे नेहमीच सकारात्मक भूमिका घेत आहेत.

याच निमित्ताने आज इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर या ठिकाणच्या पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रामध्ये नव्याने येणाऱ्या कंपनींच्या उभारणीबाबत मंत्रालयात उद्योग खात्याच्या राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी उद्योग विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सकारत्मक चर्चा केली.

या बैठकीमध्ये कंपनी उभारण्या संदर्भात सविस्तर आढावा घेऊन प्रशासकीय पातळीवर योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

error: Content is protected !!
Exit mobile version