कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारार्थ नवले व राव रुग्णालयांचा पुढाकार

2

पुणे, दि. १३ मे २०२०: कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारांसाठी बिबवेवाडी येथील राव नर्सिंग होम व नऱ्हेतील काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय यांनी पुणे महापालिकेशी सामंजस्य करार केला आहे.

पुणे मनपाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, डॉ. रामचंद्र हंकारे यांनी तर राव नर्सिंग होम चे सी ई ओ डॉ. हरिश्चंद्र साखरे व जगदीश गरदास, काशीबाई नवले, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शालिनी सरदेसाई व डॉ. मधुकर जगताप यांनी सामंजस्य करारावर सह्या केल्या.

कराराअंतर्गत महत्वाच्या अटी-शर्ती खालीलप्रमाणे :

• सदर हॉस्पिटलमार्फत पुणे शहरातील पुणे मनपाने शिफारस केलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांच्या उपचारांसाठी ३५ बेड आरक्षित करण्यात येतील
• रुग्णांवर शासनाच्या नियमानुसार रुग्णालयाने औषधोपचार करणे

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा