हवेली तालुक्यातील मांजरी बुद्रुक गावांमध्ये जखमी मोराला मिळाले जीवनदान

मांजरी बुद्रुक, दि. २ ऑगस्ट २०२०: हवेली तालुक्यातील मांजरी बुद्रुक रस्त्यावरून जाणाऱ्या माजी सैनिक विठ्ठल काकडे यांनी एका आजारी मोराला जीवदान दिले आहे. झेड कॉर्नर लेन नंबर ३ मांजरी बुद्रुक येथे मोर जंगलातून लोकवस्तीत भरकटलेला दिसला व त्यांना मोर जखमी अवस्थेत आढळून आला असता त्यांनी तात्काळ वनरक्षक बळीराम वायकर यांना फोन करून सदर घटनेची माहिती दिली.

वनरक्षक वायकर व वाघोली पक्षी मित्र मांजरी यांच्यासोबत जाऊन काकडे यांच्याकडून मोर ताब्यात घेतला असता मोर जखमी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले व त्यांनी पुढील उपचारासाठी  कात्रज अनाथालय येथे मोराला दाखल केले आहे व ठीक झाल्यास त्याला निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात येईल असे वनरक्षक बळीराम वायकर यांनी सांगितले आहे. अलिकडे धावपळीच्या युगात मानवाच्या जीवनशैलीत मोठा बदल झाल्याने मााणसाला माणसांकडेच लक्ष द्यायला पुरेसा वेळ नाही. या स्थितीत माणसाला माणूस म्हणून मदत करण्याची प्रवृत्तीही नष्ट होत असल्याचे चित्र आहे.

अशा स्थितीत जखमी पक्ष्याची वेदना लक्षात घेऊन मांजरी येथील विठ्ठल काकडे व स्थानिक नागरिकांनी जखमी मोराला जीवनदान दिले व विठ्ठल काकडे यांचे वनरक्षक वायकर यांनी कौतुक केले आहे.

पक्षीप्रेमी व स्थानिक नागरिक यांच्या प्रयत्नामुळे मोराला जीवनदान मिळाले आहे असे वनरक्षक वाईकर यांनी सांगितले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा