तबलीगी जमातमधील २० परदेशी नागरिकांची निर्दोष मुक्तता…

मुंबई, २२ ऑक्टोबर २०२०: मुंबईतील वांद्रे येथील दंडाधिकाऱ्यांनी तबलीगी जमातशी संबंधित २० परदेशी नागरिकांची निर्दोष मुक्तता केली. त्यांच्यावर कोविड -१९ संबंधित सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप होता. या परदेशी नागरिकांना दिल्लीतील तबलीगी जमात कार्यक्रमात भाग घेतला होता . त्यांच्यावर असा आरोप होता की, कोरोना काळात त्यांनी मजीद मध्ये घोळक्याने राहून कोविड -१९ विषयी नियमांचे उल्लंघन केले होते असेच हा प्रकार लपवून ठेवला. दोन स्वतंत्र निर्णयात कोर्टाने इंडोनेशिया आणि किर्गिझ प्रजासत्ताकातील या नागरिकांना बॉम्बे पोलिस अधिनियमान्वये एकाही आरोपात दोषी ठरवले नाही.

मेट्रोपॉलिटन दंडाधिकारी (अंधेरी) आर.आर. खान यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, “आरोपींनी आदेशाचे उल्लंघन केले आहे हे दर्शविण्यासाठी अभियोजन पक्षाकडे कोणतेही पुरावे नाहीत.”

आता हे परदेशी आपल्या देशात परत येऊ शकतील. ते सर्व गेल्या सात महिन्यांपासून शहरात अडकले होते. त्यांच्यावर एप्रिल महिन्यात डीएन नगर पोलिसांनी दोन वेगवेगळ्या खटल्यांमध्ये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात वकील ए.एन. शेख आणि अमीन सोलकर यांनी या परदेशी नागरिकांना वकिली केली.

निजामुद्दीन, दिल्ली येथे असलेल्या मर्कजमधील तबलीगी जमातचा कार्यक्रम कोरोनाव्हायरस पसरविण्यासाठी एक मोठा क्लस्टर मानला जात होता. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रतिनिधींविरोधात मुंबईसह देशाच्या विविध भागात गुन्हे दाखल करण्यात आले होते. लॉकडाउन असूनही, त्यांनी विविध मशिदींमध्ये जाऊन लोकांना भेटले असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला.

कोर्टाच्या म्हणण्यानुसार, साक्षीदारांनी दिलेले निवेदन आणि रेकॉर्डवरील कागदोपत्री पुरावे यांच्यात विरोधाभास आहे. कोर्टाने म्हटले आहे की, “अभियोगाने पंचनाम्याची तयारीदेखील केली नाही आणि इतर कोणत्याही स्वतंत्र साक्षीदाराचे विधान कधीच नोंदवले नाही. या प्रकरणात, अभियोगाने त्याच्या आरोपाचे समर्थन करण्यासाठी कोणतेही वैध पुरावे सादर केले नाहीत. ”

विशेष म्हणजे त्यावेळी प्रसारमाध्यमांकडून देखील मोठ्या प्रमाणावर या प्रकरणाबाबत तथ्यहीन गोष्टी दाखवण्यात आल्या. सोशल मीडियावर बनावट व्हिडिओ व धार्मिक तेढ निर्माण करणारे मेसेज देखील मोठ्या प्रमाणावर फिरताना दिसले. काही समाजकंटकांकडून देशात अशा संकटाच्या काळात देखील हिंदू-मुस्लीम असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. तसेच ठराविक पक्षांकडून याचा राजकीय लाभ देखील घेण्याचा प्रयत्न केला गेला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा