नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो कार्यालयात रकुल प्रीत सिंहची चौकशी

6

मुंबई, २५ सप्टेंबर २०२०: अभिनेत्री रकुल प्रीत सिंह यांनी शुक्रवारी नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) कार्यालयाला भेट दिली. कारण अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूशी संबंधित मादक पदार्थांच्या प्रकरणात NCB ने तीला समन्स बजावली आहे. तसेच अभिनेत्री दीपिका पादुकोणची मॅनेजर करिष्मा प्रकाश हिने आज सकाळी एनसीबी कार्यालयात भेट दिली. त्याच प्रकरणातील चौकशीत तीला सामील होण्यासाठी एनसीबीने बोलावले होते.

एनसीबीने बुधवारी सध्या चालू असलेल्या खटल्यासाठी अभिनेत्री दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंग, सिमोन खंबाट्टा आणि सेलिब्रिटी मॅनेजर श्रुती मोदी यांना समन्स बजावले होते.

करिष्मा प्रकाश केडब्ल्यूएएन टॅलेंट एजन्सीमध्ये काम करते. अगदी ” KWAN” चे मुख्य कार्यकारी अधिकारी ध्रुव चितगोपेकर आणि चित्रपट निर्माता मधु मन्तेना एनसीबीसमोर या प्रकरणात चौकशीसाठी उपस्थित राहिले. अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांची माजी बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी हिला या प्रकरणात एनसीबीने पूर्वी देखील चौकशी केली होती.

अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) अधिकृत संवाद मिळाल्यानंतर एनसीबीने तपास सुरू केला होता. त्यामध्ये अंमली सेवन, खरेदी, वापर आणि वाहतुकीशी संबंधित विविध चौकशी झाल्या. राजपूत याचे वडील केके सिंग यांनी २८ जुलै रोजी बिहारमधील रिया चक्रवर्ती विरोधात प्रथम माहिती अहवाल दाखल केल्यानंतर ईडीने ३१ जुलै रोजी सुशांतच्या मृत्यू झालेल्या प्रकरणात अंमलबजावणी प्रकरणातील माहिती अहवाल नोंदविला होता. सुशांतचा १४ जूनला मुंबईच्या निवासस्थानी मृतदेह सापडला होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा