पुण्यातील विविध भागात अधिकाऱ्यांची पाहणी

पुणे, दि. २ मे २०२०: पुण्यात कोरोनाचा धोका कायम आहे. पुणे शहर जिल्ह्यात विशेषत: पुणे शहरात कोरोना रुग्णवाढीची संख्या मोठी आहे. कोरोनासाठीच्या हॉटस्पॉटमध्ये अद्याप स्थिती नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे पुणेकरांना यापुढे अधिकच काळजी घ्यावी लागणार आहे. यासाठी आज शासनातील अधिकाऱ्यांनी पुण्यात विविध भागांची पाहणी केली.

शहरातील कोरोना हॉटस्पॉट परिसरातील पाटील इस्टेट झोपडपट्टी, कामगार पुतळा झोपडपट्टी, ताडीवाला रोड झोपडपट्टी, लक्ष्मीनगर झोपडपट्टी येरवडा या भागांत आज मा. महापौर मुरलीधर मोहोळ, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, उपमहापौर सरस्वती शेडगे,अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी पोलिस अधिकारी, अन्य वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यासह पाहणी केली. यावेळी त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच प्रशासन राबवत असलेल्या विविध उपाययोजनांवर देखील चर्चा केली.

पुणे शहर जिल्ह्यात शुक्रवारी ११५ रुग्णांची नव्याने भर पडली होती. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या १८१५ इतकी झाली होती. आज त्यात आणखी रुग्णांची भर पडली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा