कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांना अपुरा वीजपुरवठा

श्रीरामपूर : (२४ एप्रिल २०२०)
सध्या जगभरात कोरोनोचे थैमान सुरु असून सर्वत्र लाँकडाऊन आहे. त्यात सध्या उन्हाळा असल्यामुळे शेतकऱ्यांची पिके पाण्यावाचुन करपली आहेत. पाणी आहे परंतु वीजपुरवठ्याअभावी पिके जळुन जात आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात सापडलेले आहेत.
सध्या श्रीरामपुर तालुक्यातील चांडेवाडी भागात दिवसा थ्री फेज वीजपुरवठा केला जातो. वीजपुरवठ्याची वेळ सकाळी ११ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आहे. परंतु खरे पाहाता केवळ १ तास वीजपुरवठा होत असल्याची तक्रार शेतकरी करत आहेत.
महावितरणाच्या गलथान कारभाराला या भागातील शेतकरी वैतागले आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व वाहतूक आणि बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आधीच नुकसान होत आहे. त्यात महावितरणाचा असा बेभरवशी कारभार चालू आहे. विजेच्या अभावामुळे शेतकरी शेताला पुरेसे पाणी देऊ शकत नाहीत. नेमून दिलेल्या वेळेत तरी थ्री फेज वीजपुरवठा केला जावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. या संदर्भात काही शेतकरी बांधवानी ‘महावितरण’च्या श्रीरामपुर उपअभिंयता शरद बंड यांना फोन करुन, अखंडित वीजपुरवठा करण्याबाबत विनंती केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- दत्तात्रेय खेमनर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा