पंतप्रधान पदाचा केला आपमान, तर आता मंदिरे पाडून मशिदी उभारतील……

5

हैदराबाद, ७ ऑगस्ट २०२० : ५ ऑगस्ट रोजी भारतात ऐतिहासिक दिवस साजरा करण्यात आला. ज्याचे साक्षीदार सव्वाशे कोटी भारतीय झाले. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थित हा सोहळा संपन्न झाला. या हिंदुत्वाच्या विजयावर अनेकांच्या पोटात दुखू लागले आणि त्यांनी सामाजिक तेढ निर्माण करणारी विधाने बरगळायला सुरवात केली.

एमआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी हे तर आधी पासूनच या राममंदिर निर्णयाच्या विरोधात असल्याचे बघायला मिळते. तर आता त्यांचा पुन्हा एकदा नाराजीचा सुर दिसून आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या पदाचा अपमान केला आहे. ते भूमिपुजनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले म्हणुन त्यांनी ही टिका केली तर पुढे जिथे एकेकाळी मशीद उभी होती, तिथे मंदिराचं भूमिपूजन करणं हा लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेचा पराभव असून हिंदुत्त्वाचा विजय असल्याचे ओवेसी यांनी म्हटले होते.

तर आता मंदिरे पाडून मशिदी उभारतील……

अशी दर्पोक्ती ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे अध्यक्ष साजीद रशीदी यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना “मशीद ही कायम मशीदच असते असं इस्लाम सांगतं. मशीद पाडून त्या जागी काहीही दुसरं बांधता येत नाही. आम्हाला खात्री आहे की तिथे मशीद होती आणि कायम राहिल. मंदिर पाडून त्याजागी मशीद बांधण्यात आली नव्हती. पण आता कदाचित मशीद बांधण्यासाठी मंदिर पाडलं जाऊ शकतं” असे धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य त्यांनी केलं.

एकीकडे भारतात राम मंदिर भूमिपुजनामुळे अनेक वाद, राजकिय मुद्दे हे संपले असे वाटत असताना इस्लामिक नेत्यांच्या अशा वक्तव्यांमुळे पुढे समाजात धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा