गोल पोस्ट गेट टेक टेक्नॉलॉजी इंटेलने केले नवीन प्रोसेसर अनवील, मिळेल जबरदस्त परफॉर्मन्स, जाणून घ्या काय असेल...

इंटेलने केले नवीन प्रोसेसर अनवील, मिळेल जबरदस्त परफॉर्मन्स, जाणून घ्या काय असेल खास

पुणे, 6 जुलै 2022: इंटेलने त्याच्या 12व्या जनरेशन प्रोसेसर फॅमिलीचं अनावरण केलं आहे. कंपनीने हे प्रोसेसर Intel Core Experience Eventमध्ये लॉन्च केलं आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, नवीन प्रोसेसरला रिफाइंड्स मल्टी-कोर आर्किटेक्चर मिळेल, जे पीसीमध्ये चांगले परफॉर्मन्स देईल. यामध्ये नवीन परफॉर्मन्स हायब्रीड आर्किटेक्चर देण्यात आले आहे.

लेटेस्ट 12 जनरेशन प्रोसेसर Intel 7 प्रक्रियेवर तयार केले गेले आहेत. यामध्ये, नवीन आर्किटेक्चरल डिझाइन उपलब्ध आहे, ज्यामध्ये इफिसियंसी आणि परफॉर्मन्स असे दोन प्रकारचे स्पेशलाइज्ड कोर्स दिले आहेत. याशिवाय नवीन प्रोसेसरमध्ये DDR5 मेमरी, Thunderbolt 4 कनेक्टिव्हिटी आणि Intel Wi-Fi 6E सपोर्ट उपलब्ध आहे.

इंटेलच्या नवीन प्रोसेसरमध्ये काय खास

कंपनीने 12-जनरेशन HX सीरीज प्रोसेसर लॉन्च केले आहेत. ब्रँडनुसार, 12 जनरेशनच्या Intel Core HX सिरीजला मोबाइल वर्कस्टेशन्सवर डेस्कटॉप सारखा परफॉर्मन्स मिळेल. HX सिरीजला 16-कोर मिळेल, जे टॉप-नॉच परफॉर्मन्स आणि ओव्हरक्लॉकिंग सपोर्ट प्रदान करेल.

12-जनरेशन Intel Core H-सीरीज प्रोसेसरला 14-कोर मिळतील. यात उत्कृष्ट ग्राफिक्सचे वैशिष्ट्य देखील मिळेल, जे गेमिंग आणि व्हिडिओ एडिट एक्सपिरीयन्स सुधारेल. त्याच वेळी, 12 जनरेशन Intel Core U सीरीज प्रोसेसरमध्ये 10 कोर उपलब्ध असतील.

हा प्रोसेसर हलक्या लॅपटॉपसाठी लॉन्च करण्यात आला आहे. त्याच वेळी, पी-सिरीजचा प्रोसेसर लाइट फॉर्म फॅक्स आणि परफॉर्मन्स लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त, ब्रँडने इंटेल इव्हो 3rd एडिशनचे डिझाईन, स्पेसिफिकेशन्स आणि की-एक्सपीरियंस देखील प्रदर्शित केले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

error: Content is protected !!
Exit mobile version