फर्ग्युसन महाविद्यालयात अभाविप करणार तिव्र आंदोलन…

पुणे, १३ डिसेंबर २०२०: विद्यार्थी हे देशाचं भविष्य असतात. परंतू, गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्र राज्यात विद्यार्थ्यांवर वेग वेगळ्या पद्धतीनं अन्याय व अत्याचार होत आहेत. तसेच, फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना त्वरित ५०% फी भरण्यासाठी सांगण्यात येत आहे. याचसोबत, लॅबोरेटरी जी सध्या विद्यार्थ्यांकडून वापरलीच जाणार नाहीये त्यासाठी विद्यार्थ्यांकडून भरमसाठ फी घेतली जात आहे.

ती फी त्वरित कमी करण्यात यावी व विद्यार्थ्यांकडून ४ टप्यात फी घेण्यात यावी या मागणीचं निवेदन महाविद्यालय प्राचार्यांना अभाविप तर्फे देण्यात आलं होतं. तरी सुद्धा महाविद्यालया कडून या निवेदनाकडं दुर्लक्ष करून विद्यार्थ्यांना कोणत्या ही प्रकारचं सहकार्य करण्यात आलेलं नाही.

या सर्व अन्यायाच्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद दिनांक १४ डिसेंबर रोजी फर्ग्युसन महाविद्यालयात तीव्र आंदोलन करणार आहे व विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणार आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांना या आंदोलनात आपल्या न्याय हक्कासाठी सामील व्हावं असं जाहीर आवाहन देखील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं केलेलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रगती कराड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा