दुबई १६ मे २०२३ : मॅच मध्ये क्षेत्ररक्षक फलंदाजांच्या जवळ उभे असतात, यष्टिरक्षक स्टम्पजवळ उभा असतो आणि फलंदाज वेगवान गोलंदाजांसमोर फलंदाजी करत असताना सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी हेल्मेट घालणे आवश्यक आहे. याबाबत आणि इतर नियमांमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने(ICC) साेमवारी महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. क्षेत्ररक्षक, यष्टिरक्षक आणि फलंदाज यांना अाता हेल्मेट घालणे बंधनकारक असेल.
या सोबतच फ्री हिटच्या नियमातही मोठा बदल करण्यात आला आहे. आता फ्री हिटवर चेंडू विकेटवर आदळला आणि फलंदाजाने धाव घेतली, तर तो अतिरिक्त धावांच्या खात्यात नाही तर फलंदाजाच्या खात्यात जमा होईल. जर गोलंदाजाने नो बॉल टाकला तर पुढचा चेंडू फ्री हिट असेल. आता फलंदाजाला तो फ्री हिट बॉल मारता आला नाही आणि बॉल टाकला, पण त्याने एक धाव घेतली तर ती धाव त्याच्या नावे नाेंद हाेईल.
हे नवीन नियम इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यात १ जूनपासून इंग्लंडमधील लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणाऱ्या कसोटी सामन्याने सुरू होतील. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ७ जून रोजी होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्येही नवीन नियमांचा वापर केला जाईल.
न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे