लाचखोरी प्रकरणात इंटरपोलचे माजी प्रमुख मेंग होंववेई यांना तेरा वर्षांचा कारावास

बीजिंग : लाचखोरीच्या प्रकरणात इंटरपोलचे माजी प्रमुख मेंग होंगवेई यांना चीन न्यायालयाने तेरा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि दंड ठोठावला आहे. अशी माहिती न्यायालयाकडून देण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मेंग यांना फ्रान्सवरून चीनमध्ये दाखल झाल्यानंतर २०१८ मध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या विरोधात लाच स्विकारल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. मेंग यांची चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. मेंग यांनी चीन सरकारमध्ये सार्वजनिक सुरक्षा विभागाचे उपमंत्री म्हणूनही काम पाहिले आहे.
भ्रष्टाचारविरोधी मोहिमेचा वापर आपल्या विरोधकांना संपविण्यासाठी जिनपींग यांच्याकडून केला जात असल्याची टीका सातत्याने होत असते.

मेंग यांच्या पत्नीने आपल्या दोन मुलांसह पॅरिसमध्ये राजाश्रय घेतला आहे. चीनमध्ये आपले आणि मुलांचे अपहरण केले जाऊ शकते अशी भिती मेंग यांच्या पत्नीने व्यक्त केली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा