इंटरपोलने जारी केली गोल्डी बरार विरोधात रेड कॉर्नर नोटीस

नवी दिल्ली, 10 जून 2022: पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येप्रकरणी सतींदरजीत सिंग उर्फ गोल्डी बरार याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे. गोल्डी बरार याने सर्वप्रथम सिद्धू मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती.

मुसेवाला हत्येप्रकरणी इंटरपोलने गोल्डी बरार विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. पंजाबचा कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीला आता हा गोल्डी बरार नियंत्रित करत आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉरेन्स तुरुंगात गेल्यानंतर आता गोल्डी बरारने कॅनडात बसलेल्या टोळीची कमान हाती घेतली आहे.

तुरुंगात बसलेला लॉरेन्स तुरुंगातून निर्देश करतो जी कॅनडात बसलेल्या गोल्डीपर्यंत पोहोचते, त्यानंतर गोल्डी पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान आणि हिमाचलमध्ये बसलेल्या शूटरशी संपर्क साधतो, त्यांना तयार करतो, नंतर टास्क देतो आणि गुन्हे करतो. परिणाम 29 मे रोजी पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांची जवाहरके गावाजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर गोल्डी बरारने कॅनडातूनच सोशल मीडिया पोस्टद्वारे हत्येची जबाबदारी स्वीकारली. याशिवाय लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने फेसबुकवर कबुलीजबाबही देण्यात आला होता. पोलिसांनी सांगितले की, गँगस्टर गोल्डी बरार 2017 मध्ये स्टुडंट व्हिसावर कॅनडाला पळून गेला होता. त्यानंतर तो तिथून आपली टोळी चालवत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा