नशेमध्ये तरूणांनी पळवली बस स्थानकातून एसटी

6
लातूर, ५ फेब्रुवरी २०२१: राज्यात कधी कोणती घटना कशी घडेल याचा नेम नाही. कृत्य करण्यार्या व्यक्तींना अश्या प्रेरणा मिळतात कूठून हा प्रश्नच आहे. पण हल्ली राज्यात विचित्र घटना घडण्याचे जणू सत्रच सुरू आहे. आशीच एक घटना लातूर जिल्ह्यातून समोर आली आहे. ज्या मध्ये चक्क राज्य परिवहन महामंडळाची लाल परीलाच चोरण्यात आले.
रात्री उशिरापर्यंत गावाकडे जाण्यासाठी एसटी नाही म्हणून बस स्थानकातूनच एसटी पळवुन नेण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी  बस स्थानकात ही घटना घडली आहे. ज्यामधे तरूणांनी हे कृत्य केल्याचे उघड झाले आहे.
तरूणांनी दारूच्या नशेत असे कृत्य केल्याचे समजते आहे. एसटी पळवताना लाईटच्या दोन खांबांना ती जोरात आदळली. ही धडक इतक्या जोरात बसली की विजेच्या तारा तुटून खाली पडल्या, शिवाय विजेचा खांब देखील कोसळला.
 तरूणांनी हे कृत्य नशेत जरी केले असले, तरी अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.बसस्थानकात येऊन राज्य परिवहन महामंडळाची बस पळवुन नेण्याची घटना घडली आहे. पण त्यावेळी एकही कर्मचारी अगारात नव्हता का? आणि ते चालू करून बस घेऊन जाईपर्यंत कोणीच कशी ॲक्शन घेतली नाही? पण सस्थानकातील या ढिसाळ कारभारामुळे थोडेबहुत नुकसान सरकारचे झाले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा