लासूर जिल्हा परिषदच्या शाळेत इन्व्हर्टर संच आणि एलईडी टिव्ही संच भेट

चोपडा, जळगाव २६ फेब्रुवारी २०२४ : जग आज २१ व्या शतकाकडे वाटचाल करत असले तरी ग्रामीण भागात चालीरीती यांना फार महत्त्व दिले जाते. परंतु या सर्व चालीरीतींना बाजूला सारून, समाजसेवा करणारे लासूर येथील एक दानशूर व्यक्तीमत्व असलेल्या श्री नाटेश्वर पिक संरक्षण सोसायटीचे संस्थापक चेअरमन तथा माजी ग्रा. पं. सदस्य स्वर्गीय नारायण दामोदर वाघ यांचे नुकतेच अकस्मात निधन झाले.

वडील स्वर्गीय नारायण दामोदर वाघ व स्वर्गीय आई हेमलता नारायण वाघ यांचे स्मरणार्थ त्यांचा मुलगा योगेश नारायण वाघ यांनी आपल्या वडिलांच्या दशक्रिया च्या दिवशी अन्न दानावर वाजवी पेक्षा जास्त पैसा खर्च न करता, गावातील जिल्हा परिषदच्या शाळेत विद्युत पुरवठा गेल्यावर ज्या काही अडचणी निर्माण होतात, त्या दूर व्हाव्यात म्हणून इन्व्हर्टर संच आणि मुलांना सांस्कृतिक कार्यक्रम पहाण्यासाठी एलईडी टिव्ही संच उपलब्ध व्हावा. या शुध्द अंतकरणातून त्यांनी चक्क आपल्या वडिलांच्या दशक्रिया च्या दिवशी जवळ जवळ ७९,००० रूपये किम्मतीचे भेट वस्तू म्हणून दोन्ही शाळेच्या मुख्याध्यापक, उप शिक्षक यांच्या कडे सुपुर्द केले. या त्यांच्या चांगल्या कामाविषयी समाजात त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

याप्रसंगी चोपडा सहकारी सुतगिरणीचे संचालक अमृतराव वाघ, शेतकी संघाचे संचालक नारायण पाटील, प्रा.अशोक पवार अमळनेर, माजी उपसरपंच अनिल पाटील, उपेंद्र पाटील, चंद्रकांत पाटील, मनिष पाटील, राकेश पाटील यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : आत्माराम पाटील