अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजारात गुंतवणूकदारांना ११.५८ लाख कोटी रुपयांचा तोटा

पुणे, ३१ जानेवारी २०२१: अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी मागील सहा ट्रेडिंग सत्रांमध्ये भारतीय शेअर बाजाराची हळूहळू घसरण झाली.  यामुळे गुंतवणूकदारांच्या सुमारे ११.५८ लाख रुपयांची रक्कम बुडाली आहे.  आता सर्वांच्या नजरा आहेत की बजेटच्या दिवशी शेअर बाजारात काय होईल?

महत्त्वपूर्ण म्हणजे १ फेब्रुवारी म्हणजेच सोमवारी अर्थमंत्री निर्मला सीतारमण २०२१-२२ चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.  यापूर्वी, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्स गेल्या सहा व्यापार सत्रात सुमारे ३,५०० अंकांनी कमी झाला आहे. त्याचप्रमाणे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी जवळपास १०१९.१० अंकांनी खाली आला आहे.  २० जानेवारी रोजी बीएसईची मार्केट कॅप १९७.७० लाख कोटी रुपये होती, जी शुक्रवार, २९ जानेवारीपर्यंत घटून १८६.१२ लाख कोटी रुपये झाली आहे.

घसरण्याचे कारण महत्त्वाचे म्हणजे गेल्या आठवड्यात गुरुवारी सेन्सेक्सने ५० हजारांच्या विक्रमाची नोंद केली, त्यानंतर गुंतवणूकदारांनी मोठा प्रॉफिट बुकिंग करत आपली गुंतवणूक काढून घेतली.  परदेशी गुंवनुकदारांनी सतत विक्री केली  आहे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील कमकुवत कलमुळे भारतीय शेअर बाजार आणखी खाली कोसळला आहे.  गेल्या पाच सत्रांमध्ये एफआयआयने भारतीय शेअर बाजाराकडून सुमारे १२,७३१ कोटींची विक्री केली आहे.

बजेटच्या दिवशी काय होऊ शकते तज्ज्ञांचे म्हणणे आहे की बजेटच्या दिवशी शेअर बाजारात चढ-उतार अनेकदा दिसून येतात.  म्हणून गुंतवणूकदारांनी जागरुक राहिले पाहिजे.  कोरोना कालावधीत शेअर बाजारात सातत्याने वाढ झाली आहे, म्हणून परकीय भांडवल येत आहे आणि नवीन गुंतवणूकदार बाजारात येत आहेत.  जगात गुंतवणूकीच्या कमी पर्यायांमुळे हा प्रवाह कमी होईल, परंतु काही महिने ते भारतीय बाजारामध्ये राहतील.  म्हणूनच, दीर्घकालीन गुंतवणूकदारांना जास्त काळजी करण्याची आवश्यकता नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा