आयओबी बनली मार्केट कॅप च्या बाबतीत देशातील दुसरी सर्वात मौल्यवान सरकारी बँक

मुंबई, ३ जुलै २०२१: इंडियन ओव्हरसीज बँक (आयओबी) शुक्रवारी मार्केट कॅपच्या बाबतीत देशातील दुसर्‍या क्रमांकाची राज्यस्तरीय सरकारी बँक ठरली. पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) आणि बँक ऑफ बडोदा (बीओबी) ला मागे टाकत ही कामगिरी केली. बँकेची मार्केट कॅप ५० हजार कोटींच्या वर पोहोचली. फेब्रुवारी महिन्यात सादर झालेल्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात दोन सार्वजनिक बँकांच्या खासगीकरणाची घोषणा करण्यात आली. त्याअंतर्गत सरकार सेंट्रल बँक ऑफ इंडिया (सीबीआय) आणि इंडियन ओव्हरसीज बँक (आयओबी) मधील आपला हिस्सा विकू शकते.

खासगीकरणाच्या चर्चेमुळे गेल्या एका महिन्यात इंडियन ओव्हरसीज बँकेच्या शेअर्समध्ये ५७ टक्के वाढ झाली आहे. बँकेची मार्केट कॅप ५१,८८७ कोटी रुपये झाली आहे, तर पीएनबीची ४६,४११ कोटी रुपये आणि बीओबीची, ४४,११२ कोटी रुपये आहे. मार्केट कॅपच्या बाबतीत एसबीआय (३७८,८९४.३८ कोटी रुपये) पहिल्या क्रमांकावर आहे. गेल्या एका महिन्यात पीएनबीचा शेअर ४ टक्क्यांनी घसरला आहे तर बीओबीच्या शेअर मध्ये ५ टक्के वाढ झाली आहे. या काळात बीएसई सेन्सेक्समध्ये १ टक्क्यांची वाढ झाली आहे.

मार्च तिमाही निकाल

आयओबीचा शेअर ३० जून २०२१ रोजी २९ रुपयांवर गेला, जी मे २०१७ नंतरची सर्वोच्च पातळी आहे. मीडिया रिपोर्टनुसार सरकार आयओबी आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे खाजगीकरण करू शकते. मार्च तिमाहीत आयओबीचा निव्वळ नफा दुपटीने वाढून ३५० कोटी रुपये झाला आहे, जो एका वर्षापूर्वीच्या १४४ कोटी रुपये होता. या कालावधीत बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न ८.४ टक्क्यांनी घसरले असले तरी बिनव्याज उत्पन्न ९३.५ टक्क्यांनी वाढून २,०१६ कोटी रुपये झाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा