IPL 18th season starts: क्रिकेट प्रेमींची आवडती आणि आतुरतेने वाट पाहायला लावणारी (Indian Premier League) म्हणजेच आयपीएल या विश्वातील सर्वात लोकप्रिय टी-२० स्पर्धेला आज, शनिवारपासून सुरुवात होणार आहे. यावर्षीचा हा १८ वा हंगाम असणार आहे. कोलकता येथे हंगामचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर सलामीचा सामाना रंगणार आहे. आजपासून सुरू होणाऱ्या पहिल्याच सामन्यात पावसाचे देखील सावट असण्याची शक्यता आहे.
दरवर्षी प्रमाणे हंगाम सुरू होण्यापूर्वी कोणते संघ जेतेपदासाठी दावेदार असणार, मुंबई इंडियन्स किंवा चेन्नई सुपर किंग आयपीएलच्या हंगामात वर्चस्व गाजवणार का, महेंद्र सिंग धोनीची शेवटची आयपीएल असणार का, यावर्षी कोणते तारे उदयाला येणार असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडू लागले आहेत. त्यामुळे या चर्चांमुळे चाहत्यांची आयपीएलबाबत उत्सुकता अधिक वाढली. नवीन नियम व नवीन कर्णधार याकडे सुद्धा सर्व चाहत्यांचे लक्ष राहणार आहे.
कोरोना काळात चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळेचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र, आयपीएल सुरू होण्याआधी मुंबई येथे झालेल्या कर्णधाऱ्यांच्या बैठकीत ही बंदी उठविण्यात आली आहे. याशिवाय मैदानात जास्त दव असल्यावर दुसऱ्या डावातील ११ व्या षटकानंतर चेंडू बदलण्यास मुभा देण्यात आल्याने याचा फायदा गोलंदाजाना होणार आहे.
सलामीची लढत :
कोलकताच्या इडन गार्डनवर पहिल्या सामन्याचे पदार्पण होणार असून गतविजेत्या गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात सलामीचा सामाना खेळवण्यात येणार आहे. एकीकडे कोलकताचे यंदा विजेतेपद राखण्याचे, तर दुसरीकडे रॉयल चॅलेंजर बेंगळुरूचे पहिल्या जेतेपदाची प्रतीक्षा संपवण्याचे असेल. त्यामुळे सलामीचा सामना कोण आपल्या नावावर करणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी,प्रथमेश पाटणकर