आयपीएल २०२०: बीसीसीआयकडून प्ले-ऑफचे वेळापत्रक जाहीर

मुंबई, २६ ऑक्टोबर २०२०: इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चा पहिला क्वालिफायर आणि अंतिम सामना दुबई येथे होईल, तर उर्वरित दोन प्ले-ऑफ सामने अबू धाबी येथे खेळले जातील. भारतीय क्रिकेट बोर्डाने (बीसीसीआय) रविवारी याची घोषणा केली.

बीसीसीआयच्या वेळापत्रकानुसार आयपीएलचा अंतिम सामना हा दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळण्यात येणार आहे. अंतिम सामना १० नोव्हेंबरला खेळला जाणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार ७ वाजून ३० मिनिटांनी सुरुवात होणार आहे.

पहिली पात्रता फेरी १ – ५ नोव्हेंबर – गुणतालिकेतील संघ १ vs संघ २ – दुबई

बाद फेरी – ६ नोव्हेंबर – गुणतालिकेतील संघ ३ vs संघ ४ – अबु धाबी

दुसरी पात्रता फेरी – ८ नोव्हेंबर – पहिल्या पात्रता फेरीतील पराभूत संघ vs बाद फेरीचा विजेता – अबु धाबी

अंतिम सामना – १० नोव्हेंबर – दोन्ही पात्रता फेरीतील

ताज्या आकडेवारीनुसार पॉइंट्सटेबलमध्ये मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु १४ गुणांसह अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या ३ संघांना प्ले-ऑफमध्ये पोहचण्यासाठी केवळ १ विजयाची आवश्यकता आहे. त्यामुळे प्ले ऑफसाठी ३ संघ जवळपास निश्चित आहेत.

मात्र, ४ थ्या क्रमांकासाठी कोलकाता, पंजाब आणि राजस्थान यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. पंजाबने या स्पर्धेत दमदार पुनरागमन केलं आहे. त्यामुळे चौथ्या क्रमांकासाठी ३ संघांमध्ये तगडे आव्हान असणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा