दुबई, ३० ऑगस्ट २०२०: लोकप्रिय असलेल्या इंडियन प्रिमियर लीग (IPL) क्रिकेट प्रेमींसाठी दुबईत घेण्याचं BCCI नं ठरवलं.आणि IPL चे सर्व संघ भारतातून सर्व खबरदारी घेत युएईत दाखल झाले. पण तिथे गेल्यानंतर कोरोनाने खेळाडूचा पाठलाग काही सोडला नाही.
चैन्नई सुपर किंग्सच्या १२ स्टाफ बरोबर एका मुख्य गोलदांज देखील सामील आहे. त्यात दिपक चहर या बाॅलरचा समावेश आहे. त्याला कोरोना झाला असून तो सध्या युएईत आयसोलेट आहे.
दिपक चहर याची बहिण मालतीने ट्विट करुन दिपकला या कोरोना युद्धात लढण्याची प्रेरणा दिली आहे. ज्यामधे तिने “तु एक सच्चा योद्धा आहेस ज्याचा जन्म हा लढण्यासाठी झालाय. रात्रीच्या अंधारानंतर दिवस येतोच. मला आशा आहे कि तु लवकरच कमबॅक करशील, त्याची वाट मी पाहते” असं ट्विट तिने केलं आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी