आयपीएल २०२० – सी एस के संघांचा किंग्स इलेवेन पंजाब संघावर १० विकेट्स ने एकहाती विजय

दुबई, ५ ऑक्टोबर २०२०: आयपीएल २०२० च्या १८ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने किंग्स इलेवेन पंजाब संघावर १० विकेट्स ने एकहाती विजय मिळवला आहे. पहिल्या सामन्यात चेन्नई संघाने मुंबई संघावर मात केली होती. त्यानंतर चेन्नई संघाला पुढील ३ सामन्यात एकही विजय मिळवता आला नाही. विजयाच्या शोधत उतरलेल्या चेन्नई संघाने चांगल्या फॉर्म मध्ये असलेल्या पंजाब संघावर एकहाती विजय मिळवत. सी.एस.के च्या चाहत्यांना दिलासा दिला आहे.

सामन्यात किंग्स ईलेवेन पंजाब संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाब संघाला चांगली सुरुवात करून देत कर्णधार के.एल.राहुल याने ५२ चेंडूत ६३ धावांची अर्धशतकिय खेळी केली. तसेच मयंक अगरवाल याने १९ चेंडूत २६,मनिंदर सिंग याने १६ चेंडूत २७ तसेच पुरन ने १७ चेंडूत ताबडतोड ३३ धावा केल्या. पंजाब संघाने २० षटक अखेर ४ बाद १७८ धावा केल्या. चेन्नई संघाकडून गोलंदाजी करतांना शार्दुल ठाकूर याला २ तर रवींद्र जडेजा आणि पियूष चावला यांना प्रत्येकी १ विकेट मिळाला.

१७९ धावांचा पाठलाग करताना चेन्नई संघाला सुरुवाती पासून जी सुरुवात मिळाली ती शेवटपर्यंत कायमच राहिली . फाफ डू प्लेसी आणि शेन वॉटसन या दोघांनीच चेन्नई संघाला एकहाती विजय मिळवून दिला. शेन वॉटसन ने ५३ चेंडूत ८३ तर डू प्ले सी ने ५३ चेंडूत ८७ धावा करत चेन्नई संघाला विजय मिळवून दिला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा