गोल पोस्ट क्रीडा क्रिकेट आयपीएल २०२० – दिल्ली कॅपिटल संघाने चेन्नई सुपर किंग्ज संघावर केली ४४...

आयपीएल २०२० – दिल्ली कॅपिटल संघाने चेन्नई सुपर किंग्ज संघावर केली ४४ धावांनी मात

दुबई, २६ सप्टेंबर २०२०: काल झालेल्या दिल्ली कॅपिटल आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्या सामन्यात , दिल्ली कॅपिटल संघाने ४४ धावांनी विजय मिळवला आहे. आयपीएल २०२० मध्ये चेन्नई संघाचा आतापर्यंत झालेल्या ३ सामन्यांमधून दुसरा पराजय आहे. तसेच दिल्ली कॅपिटल संघाने २ सामने खेळले आहेत . आणि दोन्ही सामन्यात विजय मिळवत ४ गुणांसोबत पॉइंट्स टेबल मध्ये पहिल्या स्थानी आहे.तसेच सीएसके संघ ४ थ्या स्थानी आहे.

या सामन्यात सीएसके संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करत . दिल्ली कॅपिटल संघाला फलंदाजीचे आमंत्रण दिले. आणि दिल्ली संघाच्या पहिल्या दोन्ही फलंदाजांनी दिल्ली संघाला चांगलीच सुरुवात करून दिली. शिखर धवन याने २७ चेंडूत ३५ तर पृथ्वी शॉ याने ४३ चेंडूत ६४ धावांची खेळी केली . त्यानंतर ऋषभ पंत याने आक्रमक २५ चेंडूत ३७ धावांची खेळी केली .चेन्नई संघाकडून पियूष चावला याने ४ षटकात ३३ धावा देत २ महत्वाच्या विकेट्स घेतल्या. आणि सॅम करण याने ४ षटकात २७ धावा देत १ विकेट आपल्या नावे केला.२० षटकांच्या खेळीनंतर दिल्ली संघाने ३ विकेट्स गमावत १७५ धावा केल्या.

१७६ धावांचा पाठलाग करताना चेन्नई संघाच्या सलामीच्या फलंदाजांनी संघाला योग ती साथ दिली नाही. आणि स्वस्त:त पैविलियन मध्ये परतले. त्यानंतर डूप्लेसीने पुन्हा एकदा सामना सांभाळत ४३ धावा केल्या पण उर्वरित खेळाडूंकडून योग्य ती साथ मिळाली नाही .केदार जाधव ने २१ चेंडूत २६ धावा , आणि धोनी ने १२ चेंडूत १५ धावा केल्या. दिल्ली संघाकडून गोलंदाजी करताना रबाडा ने ४ षटकात २६ धावा देत ३ विकेट्स घेतल्या , नोर्जे ने २ आणि अक्षर पटेल ने १ विकेट घेतला. आणि दिल्ली कॅपिटल संघाने चेन्नई संघावर ४४ धावांनी दणदणीत विजय मिळवला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावरे

error: Content is protected !!
Exit mobile version