दुबई २० ऑक्टोबर,२०२०:भारतीय संघाचा पूर्व अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याला अजूनही वाटत आहे. चेन्नई सुपर किंग्स संघ आयपीएल २०२० मध्ये प्ले ऑफ साठी क्वालीफाय करू शकतो. पहिल्या १० सामन्यात चेन्नई च्या संघाने ७ सामने गमावले आहेत.आता त्यांना उर्वरित ४ सामने खेळायचे आहेत. सोमवारी झालेल्या चेन्नई सुपर किंग्स विरुध्द राजस्थान रॉयल्स यांच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने ७ विकेट्स ने पराभव केला होता. यांनतर चेन्नई संघाचे प्ले ऑफ मध्ये जाण्याचे मार्ग कठीण झाले आहेत.
इरफान पठाण म्हणाला,” महेंद्र सिंग धोनी कडे असा संघ आहे जो आता ही कम बॅक करू शकतो. पठाण ने स्टार स्पोर्ट्स च्या शो मध्ये म्हंटले,” जर कोणता संघ असेल जो ७ व्या किंवा ८ व्या क्रमांकावरून वापसी करू शकतो तर तो संघ सी.एस.के आहे. सी.एस.के. संघाला चांगलेच माहित आहे. खेळाडूंचा चा योग्य वापर कसा करायचा ते. खेळाडूंना ते आपली एक जागा देतात. मी स्वतः २०१५ च्या सीजन मध्ये या संघाचा भाग होतो. त्यांच्यासाठी खेळाडू खूप महत्त्वाचे आहेत.”
पुढे तो म्हणाला,” या फ्रेंचायजी ला खूप वर्षांचा अनुभव आहे. चेन्नई लीग मध्ये ही ते असेच संघ व्यवस्थापन करतात. इथे फक्त खेळाडू महत्त्वाचे असतात. तुम्ही जा मैदानावर खेळा आणि आम्ही तुम्हाला बॅक करू. चेन्नई संघाचा हा ११ वा सीजन आहे. आणि संघ जर प्ले ऑफ मध्ये नाही पोहोचला तर हे पहिल्यांदाच होईल. सी.एस.के संघ खूप वर्षांपासून चांगले प्रदर्शन करत आहे. या संघात हरभजन सिंग आणि सुरेश रैना यांच्या संघात नसल्यामुळे संघात खूप फरक जाणवत आहे. आणि इतर खेळाडू हे दुखापती मुळे बाहेर आहेत. तरी मला खात्री आहे. सी.एस. के संघ वापसी करेल कारण त्यांच्याकडे धोनी सारखा कर्णधार आहे”.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावरे