शारजाह, ४ ऑक्टोबर २०२०: आयपीएल २०२० मधील १६ व्या सामन्यात डेल्ही कॅपिटल संघाने कोलकाता नाईट रायडर्स संघावर १८ धावांनी मात केली आहे. सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
शारजहाचे मैदान छोटे आहे आणि या मैदानावर चौकार षटकारांचा पाऊस पडणे निश्चित होते. अशातच दिल्लीच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना २२८ धावा केल्या. दिल्लीच्या संघाला पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी धमाकेदार सुरुवात करून दिली. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर याची ३८ चेंडूत ८८ धावांची खेळी आणि रिषभ पंत याची १७ चेंडूत ३८ धावांचा खेळीमुळे दिल्ली संघाने २२८ पर्यंत मजल मारली.तसेच कोलकाता संघाकडून गोलंदाजी करतांना अंद्रे रसल याला २ विकेट्स तर चक्रवर्ती आणि नगरकोटी यांना प्रत्येकी एक एक विकेट्स मिळाल्या.
२२९ धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाला योग्य ती सुरुवात मिळाली नाही. ओपणर सुनील नरेन आणि शुबमन गील हे स्वस्तात परतले. त्यानंतर नितीश राना याने सामना सावरत ३५ चेंडूनमध्ये ५८ धावांची खेळी केली. त्यानंतर इओन मॉर्गन याने शेवटच्या षटकांमध्ये सामना विजयाच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मॉर्गनने ताबडतोड १८ चेंडूत ४४ धावा केल्या. परंतु कोलकाता संघाला विजय मिळवून देण्यात त्याला यश मिळाले नाही. आणि दिल्ली कॅपिटल संघाने सामने १८ धावांनी आपल्या नावावर केला.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावरे