अबू धाबी : ३ ऑक्टोबर,२०२०: आज झालेल्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर सामन्यात , रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाने ८ गडी राखून विजय मिळवला आहे. या सामन्यानंतर बँगलोर संघ पॉइंट्स टेबल मध्ये प्रथम स्थानी पोहोचला आहे.
सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत राजस्थान रॉयल्स संघाने ६ विकेट्स गमावत १५४ धावा केल्या.यात महिपाल लामरोर याने सर्वाधिक ३९ चेंडूत एक चौकार आणि तीन षटकार मारत ४८ धावा केल्या. तसेच रॉबिन उथप्पा याने २२ चेंडूत १७, जोस बटलर १२ चेंडूत २२ धावा, रीयान पराग याने १८ चेंडूत १६ धावा आणि राहुल तेवतीया याने नाबाद १२ चेंडूत १६ धावा केल्या. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाकडून गोलंदाजी करतांना युजवेंद्र चहल याने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तसेच उदाणा याला २ विकेट्स आणि नवदीप सैनी याला १ विकेट मिळाला.
१५५ धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाकडून योग्य अशी सुरुवात झाली नाही. ओपनर आरोन फिंच हा फक्त ७ चेंडूत ८ धावा करून माघारी परतला. त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि देवधर पाडीकल यांच्या अर्धशतकीय खेळीमुळे रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाने राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध एकहाती विजय मिळवला. कर्णधार विराट कोहली याने नाबाद ७२ धावा केल्या. तसेच देवधर पाडिकल याने ६३ धावा केल्या. आणि ए.बी. डिवीलियर्स याने नाबाद १२ धावा केल्या. आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाने ८ विकेट्स ने विजय मिळवला.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे