CSK (Chennai) vs RCB (Bengaluru): इंडियन प्रीमियर लीग ( IPL 2025) ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील सर्वांत लोकप्रिय संघांमध्ये गणना होणारे चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आज, शुक्रवारी आमनेसामने येणार आहेत. या सामन्यात बेंगळुरू विराट कोहली आणि चेन्नईचा महेंद्रसिंह धोनी यांच्याकडे चाहत्यांचे लक्ष असणार आहे. एकीकडे आयपीएलच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्सने ५ वेळा ट्रॉफी जिंकली आहे, तर दुसरीकडे आयपीएलच्या इतिहासात बेंगळुरूची पाटी कोरिच आहे.
दोन्ही संघाने हंगामात पहिला विजय मिळवत गुणतालिकेत २ पॉइंट मिळवले आहेत. बंगलोरने गतविजेत्या कोलकाताचा पहिल्याच सामन्यात पराभव केला, तर चेन्नई सुपर किंग्सने आपकल्या प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्सचा पराभव करत यंदाच्या हंगामात यशस्वी सुरुवात केली. त्यामुळे आणखीन २ पॉइंट मिळवण्यासाठी दोन्ही सज्ज झाले आहेत.
काय सांगते आकडेवारी :
आकडेवारीनुसार, आयपीएलमध्ये दोन्ही संघ ३३ वेळा एकमेकांसमोर आमने-सामने आले आहेत. ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला २१ वेळा हरवले आहे, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ११ सामने जिंकेल आहेत. बंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्सची सर्वोच्च धावसंख्या २२६ ही राहिली आहे. याशिवाय बंगळूरुच्या संघाने चेपॉकवर केवळ एकदा चेन्नईला पराभूत केले आहे. त्यांनी हा विजय २००८ मध्ये म्हणजेच ‘आयपीएल’च्या पहिल्या हंगामात मिळवला होता. आता बंगळूरुचा संघ चेपॉकवरील १७ वर्षांपासूनची विजयाची प्रतीक्षा संपविणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी,प्रथमेश पाटणकर